एका सुंदर वळणावर दिसतो अथांग समुद्र... महाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्ग

महाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्ग रत्नागिरी जिल्ह्यात आहे. 

| Sep 28, 2024, 00:02 AM IST

Aare Ware Beach Ganapatipule : महाराष्ट्राचा स्वर्ग म्हणजे कोकण... कोकण जितका सुंदर तितकाच सुंदर इथला प्रवास देखील आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात नयनरम्य सागरी मार्ग आहे. या मार्गावरील एका सुंदर वळणावर अथांग समुद्र दिसतो. जाणून घेऊया हा सागरी मार्ग नेमका आहे कुठे?

1/10

निसर्गरम्य कोकणात फिरताना सागरी मार्गावरचा प्रवास म्हणजे अविस्मरणीय अनुभव.

2/10

 एकाच डोंगराच्या दोन बाजूला दिसणारे हे समुद्र किनारे नैसर्गिक चमत्कार मानला जातो. 

3/10

आरे वारे रोडने प्रवास करताना प्रवास संपूच नये असं वाटतं.

4/10

या समुद्र मार्गावरुन प्रवास करताना डोंगराच्या माथ्यापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंतचे निळेशार पाणी आणि चमचमीत पांढरी वाळू, हिरवीगार झाडे आणि तेजस्वी आकाश असे विहंगम दृष्य दिसते.  

5/10

या डोंगराच्या माथ्यावरून दोन्ही बाजूंच्या समुद्रकिनाऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते.

6/10

आरे आणि वारे  हे समुद्रकिनारे एकाच डोंगराच्या दोन बाजूला वसलेले आहेत. 

7/10

अरबी समुद्रात प्रवेश करणारी डोंगराची कड या दोन समुद्रकिनाऱ्यांना विभाजित करते.

8/10

आरे आणि वारे या गावांजवळील हे दोन सुमद्र किनारे आहेत. या समुद्र किनाऱ्याच्या बाजूनेच गणपतीपुळे येथे जाणारा हा सागरी मार्ग आहे.   

9/10

रत्नागिरीहून गणपतीपुळ्याला जाताना आरे वारे या समुद्र किनाऱ्यालगत हा सागरी मार्ग आहे.  

10/10

कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे जाताना हा सुंदर सागरी मार्ग लागतो.