7 नेत्यांच्या नावांसोबत राज ठाकरे यांचे नावही आले मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत?

मनसेकडून लोकसभा स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू झालीय. राज ठाकरे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यामुळेच सध्या हिंदू सण जोरात साजरे केले जातायत अशी प्रतिक्रिया अभिजीत पानसेंनी दिली. 

Oct 02, 2023, 23:11 PM IST

Raj Thakrey : राज्यातलं सर्वोच्च पद म्हणजे मुख्यमंत्रीपद. प्रतिष्ठा, दरारा, थाटमाट पाहून आमदार बनलेल्या प्रत्येकालाच मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा असतेच. काहीजण जाहीर कार्यक्रमातून तर काही जण ऑफ द रेकॉर्ड मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवतात. प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्यालाही आपल्या साहेबानं मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असतं. पुन्हा एकदा मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय. आता मनसे नेते अभिजित पानसेंनी तसं बोलून दाखवलं. 

1/7

विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारी होर्डिंग्स पुणे आणि त्यांची सासुरवाडी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तेर गावात लागली होती. 

2/7

एखाद्या राज्यातलं सर्वात शक्तिशाली राजकीय पद म्हणजे मुख्यमंत्रीपद. मात्र सध्या महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांचं पिक आलंय.

3/7

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही भावी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लागले.   

4/7

खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना भावी मुख्यमंत्री म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.   

5/7

लोकांच्या मनातील मुख्यमंत्री शब्दप्रयोग पंकजा मुंडेंबद्दल झाला आणि तिथून जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं बिरुद त्यांच्यामागे लावलं गेलं.

6/7

वरळी मतदारसंघातून जिंकून आल्यानंतर आदित्य ठाकरेंचाही भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणारी पोस्टर्स झळकली आहेत. 

7/7

देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं भावी मुख्यमंत्री अशी पोस्टर्स नुकतीच नागपुरात लागली होती.