पार्थीवाला ना अग्नी, ना दफन, ना पाण्यात वाहतात... मग 'या' देशात कसे होतात अंत्यसंस्कार?

भारतात असो किंवा संपूर्ण जगात वेगवेगळ्या पद्धतीनं अंत्यविधी करतात. हिंदू हे पार्थिवाला अग्नी दिला जातो. तर मुस्लिम-ईसाई दफन करतात. तर पापुआ न्यू गिनीतील समाजात पार्थिवाला न अग्नी देतात ना दफनवतात. इतकंच नाही तर मृतदेहाला एका खास पद्धतीने जतन केले जाते आणि धुराचे ममीफिकेशन करतात. 

Diksha Patil | Jan 24, 2025, 19:25 PM IST
1/7

जगभरात अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्मात त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा असतात. त्यात एक महत्त्वपूर्ण परंपरा आहेत. अर्थात प्रत्येक धर्मात कोणत्याही व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्या पार्थीवावर वेगवेगळ्या पद्धतीनं अंत्यविधी करतात. 

2/7

हिंदू धर्मात कोणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पार्थीवाल अग्नी दिला जातो. तर मुलांचं निधन झालं असेल तर त्यांचं पार्थीव हे नदीत प्रवाहित करण्याची परंपरा आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक धर्माची एक वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्या त्यांचे विश्वास आणि परंपरांवर आधारीत आहे. 

3/7

इस्लाम धर्मात मृत्यूनंतर पार्थीवाला दफन करतात आणि ही परंपरा ईसाइ धर्मात दाखवण्यात येते. पण असा देश आहे जिथे पार्थीवाला नाही अग्नी देतात नाही ही दफनवतात. 

4/7

जगात अशा जाती आहेत, ज्या त्यांच्या वेगवेगळ्या आणि विचित्र प्रथांसाठी ओळखल्या जातात. पापुआ न्यू गिनीमध्ये देखील अशा परंपरा आहेत. ज्या ऐकण्यात खूप वेगळ्या आणि विचित्र वाटतात. सर्वसामान्यांचा विचारही करू शकत नाही अशी त्यांची परंपरा आहे. 

5/7

आफ्रिकेतील पापुआ न्यू गिनी या देशात अंत्यविधीला घेऊन विचित्र प्रथा आहे. या जमातींमध्ये, मृत्यूनंतर, मृतदेह बांबूच्या खांबावर उंच ठिकाणी किंवा डोंगराळ भागात लटकवून जतन केला जातो. जेणेकरून तो त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी आठवण म्हणून पिढीसाठी राहिल.

6/7

त्या लोकांना वाटतं की त्यांचे पूर्वज हे त्यांची सुरक्षा करतात आणि त्यांचे आशीर्वाद कायम त्यांच्यासोबत राहतात. त्यामुळे मृत शरीराला जतन करण्यात येते. हा त्यांचा इतिहास आणि संस्कृतीचा भाग आहे. 

7/7

पापुआ न्यू गिनीच्या या विचित्र परंपरेमुळे अनेक पर्यटक हे येथे येतात. पर्यटकांना त्यांची संस्कृती आणि परंपरा जाणून आणि समजून घ्यायच्या आहेत. तर आधुनिक काळात या परंपरांमध्ये अनेक बदलही झाले आहेत. आता काही ठिकाणी पार्थीवाला अग्नी देण्याचे किंवा दफन करण्याला स्वीकारले आहे. पण स्मोक ममीफिकेशनची परंपरा अजूनही अनेक ठिकाणी सुरु आहे.