टॉप 100 मध्ये 'या' 3 भारतीय चित्रपटांचा समावेश, आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही रेकॉर्ड

आज आम्ही तुम्हाला भारतीय तीन चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची गणना जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये केली जाते. 

Soneshwar Patil | Jan 24, 2025, 18:54 PM IST
1/7

भारतीय चित्रपटसृष्टीला आज 100 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. येथे दरवर्षी अनेक अप्रतिम चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण असे काही चित्रपट आहेत जे लोकांमध्ये वेगळी क्रेझ निर्माण करतात.

2/7

मात्र, बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत जे प्रेक्षकांच्या हृदयावर कायमचे राज्य करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यांची गणना जगातील 100 सर्वोत्तम चित्रपटांमध्ये केली जाते. 

3/7

यामधील पहिल्या चित्रपटाचे नाव आहे 'प्यासा'. गुरुदत्त आणि वहीदा रहमान यांचा 'प्यासा' हा चित्रपट भारतातील महान चित्रपटांमध्ये गणला जातो. 

4/7

या चित्रपटात गुरुदत्त यांनी एका उर्दू कवीची भूमिका साकारली होती. ज्यांमध्ये त्यांच्या कामाचे आणि कविताचे कोणीही कौतुक करत नाही.

5/7

भारतातील सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीमधील दुसऱ्या चित्रपटाचे नाव 'पाथेर पांचाली' आहे. हा चित्रपट यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे. 

6/7

 सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीमधील तिसऱ्या चित्रपटाचे नाव 'नायकन' आहे. या चित्रपटात कमल हासनचा दमदार अभिनय बघायला मिळाला होता. 

7/7

नायकन हा चित्रपट 1987 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाचा बॉलिवूडमध्ये रिमेकही बनवण्यात आला होता ज्याचे नाव होते 'दयावान'.