‘ही’ हिंदू महाराणी औरंगजेबासाठी सती जाण्यास होती तयार; तिच्या सौंदर्यासमोर मुघल पण होते घायाळ

औरंगजेब हा सर्वात क्रूर आणि खतरनाक मुघल शासक होता. 1658 ते 1707 या काळात औरंगजेब जगातील सर्वात श्रीमंत साम्राज्यांपैकी एक होता. औरंगजेबावर हिंदू समुदायाविरुद्ध अनेक आरोप आहेत.    

नेहा चौधरी | Feb 21, 2025, 16:45 PM IST
1/7

इतिहासाच्या पानांमध्ये जेवढ आपण खोलवर गेलो तिथे अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होतो. औरंगजेबबद्दल पाठपुस्तकातूनही अनेक गोष्टी सांगण्यात आलंय. पण इतिहासकार यांनी लिहिलेल्या पुस्तकात औरंगजेबादबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, औरंगजेबाला दोन हिंदू पत्नी होत्या.   

2/7

हो, औरंगजेब यांच्या दोन हिंदू पत्नींचं नाव नवाबबाई आणि उदयपुरी असं इतिहास तज्ज्ञ सांगतात. त्या दोघींचं औरंगजेबवर खूप प्रेम होतं. धक्कादायक म्हणजे औरंगजेबाच्या प्रेमात उदयपुरी राणी सती जाण्यास तयारी होती. ती म्हणाली होती की, काही कारणाने जर तिच्या पूर्वी औरंगजेब मरण पावला तर ती जगण्यापेक्षा सती जाणे पसंत करेल. पण काही ठिकाणी या उल्लेखबद्दल संभ्रम आहे.   

3/7

एका मीडिया रिपोर्टनुसार, औरंगजेबाने स्वतः एका पत्रात याचा उल्लेख केल्याच पाहिला मिळतं. मात्र औरंगजेब आणि उदयपुरी यांनी एकाच वर्षी मृत्यूने कवटाळलं, हा योगायोग घडून आला. 

4/7

एका बातमीनुसार, 'रुक्कत-ए-आलमगिरी', 'लेटर्स ऑफ औरंगजेब' च्या इंग्रजी भाषांतरात याचा उल्लेख तुम्हाला पाहिला मिळतो. औरंगजेबाने हे पत्र त्याच्या मुलाच्या नावाने लिहिले होतं, असं या पुस्तकांमध्ये लिहिण्यात आलंय. 

5/7

तर या पुस्तकांमध्ये असाही उल्लेख आहे, औरंगजेबाची सर्वात लाडकी राणी ही उदयपुरी होती. इतिहासकारक असं सांगतात की, औरंगजेब त्याची पत्नी उदयपुरी हिच्या नावाने अनेक लोकांच्या चुका त्याने माफ केला होत्या.   

6/7

एका माहितीनुसार, उदयपुरीच्या सल्ल्यानुसार औरंगजेब आपला मुलगा काम बख्शच्या सर्व चुका माफ केल्या होत्या, असं सांगितलं जातं. उदयपुरी या दिसायला खूप सुंदर होत्या. 

7/7

असं म्हटलं जातं की जेव्हा औरंगजेब 50 वर्षांचे होते तेव्हा उदयपुरी खूपच लहान होत्या. उदयपुरी तिच्या तारुण्यात असताना मुघल शासक घायाळ होते. अशा परिस्थितीत उदयपुरीच्या सौंदर्याचा आणि आकर्षणाचा प्रभाव शेवटपर्यंत औरंगजेबावर कायम असल्याच पाहिला मिळलं.