विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळतील 10 लाख रुपये! कुठे पाठवायचा अर्ज? पात्रता काय? सर्वकाही जाणून घ्या
आता गरीब कुटुंबातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज भासणार नाही किंवा त्यासाठी काही तारण ठेवण्याचीही गरज भासणार नाही.
Pravin Dabholkar
| Nov 07, 2024, 13:32 PM IST
PM Vidya Lakshmi Yojana:आता गरीब कुटुंबातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज भासणार नाही किंवा त्यासाठी काही तारण ठेवण्याचीही गरज भासणार नाही.
1/10
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळतील 10 लाख रुपये! कुठे पाठवायचा अर्ज? पात्रता काय? सर्वकाही जाणून घ्या

PM Vidya Lakshmi Yojana: गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मुलांना चांगले शिक्षण मिळवून देणे ही पालकांसाठी काळजीची गोष्ट असते. प्रत्येकालाच आपल्या मुलांना उत्तम शाळेत पाठवायचे असते, पण आर्थिक अडचणींमुळे प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण आता अशा पालकांना काळजी करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने पीएम विद्या लक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजना सुरू केली आहे. याचा देशातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
2/10
कर्जासाठी काही तारण ठेवण्याचीही गरज

केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. यामुळे आता गरीब कुटुंबातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज भासणार नाही किंवा त्यासाठी काही तारण ठेवण्याचीही गरज भासणार नाही. या योजनेत अर्ज करण्याची पात्रता काय आहे? अर्ज कसा करायचा? सर्वकाही जाणून घेऊया.
3/10
दरवर्षी 22 लाख विद्यार्थ्यांना लाभ

4/10
7 लाख नवीन विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ

केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमारे 22 लाख विद्यार्थी या संस्थांमध्ये प्रवेश घेतात. म्हणजेच इतक्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र, ही सवलत दरवर्षी केवळ 1 लाख विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. सरकारने यासाठी 3,600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ज्यातून 2024-25 ते 2030-31 या वर्षात 7 लाख नवीन विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळेल असा अंदाज आहे.
5/10
योजनेची खास वैशिष्ट्ये आणि पात्रता

या योजनेत डिजिटल ॲप्लिकेशनद्वारे पारदर्शक प्रक्रियेद्वारे शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे.हे कर्ज फक्त उच्च शिक्षणासाठीच मिळणार आहे. यासाठी निवडक 860 संस्थांमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे.केंद्र सरकार 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 75 टक्के क्रेडिट गॅरंटी देणार आहे. 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.
6/10
व्याजात 3 टक्के सवलत

7/10
कर्जावरील व्याज सवलतीचा लाभ

विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत सरकार दरवर्षी केवळ 1 लाख विद्यार्थ्यांना कर्जावरील व्याज सवलतीचा लाभ दिला जाणार आहे. जे विद्यार्थी आधीच इतर कोणतीही सरकारी शिष्यवृत्ती मिळवत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सरकारी संस्थांमध्ये तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य असेल,याची नोंद घ्या.
8/10
अर्ज कसा करायचा?

केंद्र सरकारच्या या योजनेसाठी अर्ज डिजिटल पद्धतीने स्वीकारला जाईल. उच्च शिक्षण विभागाच्या 'पीएम-विद्यालक्ष्मी' हे एकात्मिक पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. विद्यार्थ्यांना बँकेकडे शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करावा लागेल. यानंतर या पोर्टलवर जाऊन व्याज सवलतीसाठी अर्जही केला जाणार आहे. यानंतर विद्यार्थ्याला ई-व्हाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) वॉलेटद्वारे व्याज सवलत दिली जाईल.
9/10
कोणती कागदपत्रे आवश्यक?

10/10
आधीच दोन शैक्षणिक कर्ज योजना
