त्रिशुळासारखी लाईट, डमरुसारखी ड्रेसिंगरुम अन् 330 कोटी रुपये! मोदींच्या मतदारसंघातील क्रिकेट ग्राऊण्ड पाहाच

Lord Shiva Theme Varanasi Cricket Stadium Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्टेडियमचा भूमीपूजन सोहळा शनिवारी पार पडला. हे स्टेडियम अनेक अर्थांनी खास आणि वेगळं असणार आहे. पंतप्रधानांनीच हे स्टेडियम बांधून झाल्यानंतर कसं दिसेल याचे काही खास फोटो पोस्ट केलेत. पाहूयात या स्टेडियमची वैशिष्ट्ये आणि त्याचे फोटो...

| Sep 24, 2023, 12:39 PM IST
1/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी वाराणसीमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या कामाचं भूमीपूजन पार पडलं. 

2/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, कपील देव, रवी शास्त्री, सुनील गावसकर, दिलीप वेंगावसकर यासारखे माजी दिग्गज खेळाडू उपस्थित होते.

3/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अनेक पदाधिकारी ज्यामध्ये अध्यक्ष रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव जय शाह सुद्धा वाराणसीतील या मैदानाच्या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित होते.

4/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

मोदींच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आलेलं वाराणसीमधील मैदान हे जगातील सर्व मैदानांपेक्षा फारच हटके असणार आहे.

5/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

हे मैदान बांधून पूर्ण झाल्यानंतर कसे दिसेल याचे फोटो पंतप्रधानांनीच शेअर केले आहेत. तसेच है मैदान भगवान शंकर ही थीम केंद्रस्थानी ठेऊन उभारलं जाणार आहे. या मैदानाची वैशिष्ट्ये आणि ते इतरांहून कसं वेगळं असेल पाहूयात...

6/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

या मैदानाची प्रेक्षक क्षमता ही 30 हजार इतकी असेल. मैदानामधील आसन व्यवस्था ही गंगेच्या घाटावरील पायऱ्यांप्रमाणे असेल. या मैदानामध्ये एकूण 7 खेळपट्ट्या असतील. हे मैदान डिसेंबर 2025 पर्यंत बांधून पूर्ण होईल.

7/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे मैदान उभारण्यासाठी गांजारी येथील जमीन खरेदीवर 120 कोटींचा खर्च केला आहे.

8/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

हे मैदान बांधण्यासाठीचा संपूर्ण खर्च भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय करणार आहे. या मैदानाच्या उभारणीसाठी 330 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

9/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

मैदानाच्या डिझाइनमध्येच भगवान शंकर आणि काशी देवस्थानाची थीम जागोजागी दिसून येणार आहे. छप्पर हे चंद्रकोरीच्या आकाराचं असेल.

10/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

विशेष म्हणजे या मैदानाच्या सर्व लाईट्सचे खांब हे त्रिशुळाच्या आकाराचे असतील. तसेच बेलाच्या पानांचं डिझाइनही वापरलं जाणार आहे.

11/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

या मैदानातील इमारतीचा एक भाग डमरुच्या आकाराचा असून तो सुद्धा मोदींनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये उठून दिसत आहे. ही इमारत खेळाडूंसाठीचं ड्रेसिंग रुम असेल की प्रेक्षकांसाठीची बाल्कनी याबद्दल सध्या वेगवेगळे दावे केले जात आहेत.

12/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

वाराणसीमधील हे मैदान उत्तर प्रदेशातील तिसरं क्रिकेट स्टेडियम असणार आहे. राजातलाब परिसरातील रिंग रोडवर असणाऱ्या या नव्या स्टेडियमबरोबरच उत्तर प्रदेशमध्ये सध्या कानपूरचं क्रिन पार्क आणि लखनऊमधील क्रिकेट स्टेडियम कार्यरत आहे.

13/13

PM Modi Varanasi Cricket Stadium 5 Facts You Need To Know

वाराणसीमधील स्थानिकांना यामधून रोजगार मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. येथील चालकांना आणि नाव चालवणाऱ्यांनाही पर्यटक संख्या वाढल्याने अधिक काम आणि रोजगार मिळेल असंही मोदींनी सांगितलं.