साखरपुडा तुटल्यानंतर आजही अविवाहित आहे बिग बींची जबरा फॅन; सलमानसोबत दिसणारी चिमुकली रेड लाईट एरियात अडकली अन्...

Entertainment News : फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून साखरपुडा तुटल्यानंतर तिने आजपर्यंत लग्न केलं नाही. बिग बींची फॅन आणि सलमानसोबत काम करणारी ही अभिनेत्री तुम्ही ओळखली का?

नेहा चौधरी | Sep 24, 2023, 17:04 PM IST

Happy Birthday Divya Dutta : बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनयाची आवड असणारी या अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहे. 

1/15

हिंदीच नाही तर इंग्रजीस पंजाबी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम या भाषांमधील चित्रपटात हिने कामं केलं आहे. आपल्या गोंडस हास्य आणि अभिनयाने तिने सर्वांचं मनं जिंकली आहे.

2/15

सिनेविश्वात आपली वेगळी छाप पाडणारी ही अभिनेत्री म्हणजे दिव्या दत्त. हिचा 25 सप्टेंबरला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्याबद्दल माहिती नसलेल्या गोष्टीबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

3/15

दिव्याचा जन्म 1977 मध्ये पंजाबमधील लुधियानामध्ये झाला. ती सात वर्षांची असताना तिच्या डोक्यावरून वडिलांची सावली हरपली. वडिलांच्या निधनानंतर आई डॉ. नलिनी दत्ता यांनी दिव्याला लहानचं मोठं केलं. डॉ. नलिनी दत्ता या सरकारी अधिकारी होत्या. 

4/15

पंजाबी टीव्ही जाहिरातून कामाला सुरु करुन दिव्याने वयाच्या 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. 'इश्क में जीना इश्क में मरना' हा तिचा पहिला चित्रपट होता.   

5/15

1995 मध्ये रिलीज झालेला 'वीरगती' यात दिव्या सलमान खानसोबत दिसली. त्यानंतर 2004 मधील 'वीर जरा'ने तिला नवीन ओळख मिळवून दिली.   

6/15

'भाग मिल्खा भाग' या चित्रपटात तिने फरहान अख्तरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केलं. 

7/15

दिव्याला 2018 मध्ये इरादा चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात ती नसीरुद्दीन शाह, अर्शद वारसी, शरद केळकर, सागरिका घाटगे यासोबत दिसली होती.

8/15

अभिनेत्रीने एकदा सांगितलं होतं की, तिने आईचा जीव वाचविला होता. ती 10 वर्षांची असताना दिल्लीत बोटिंगसाठी गेली असताना तिच्या आईचा एका व्यक्तीशी वाद झाला होता. त्यावेळी तिची आई अचानक तलावात पडली. तेव्हा छोट्याशा दिव्याने विचार न करता पाण्यात उडी मारली आणि आईचा जीव वाचवला. 

9/15

अभिनयासोबत दिव्या आज एक लेखिका आहे. तिने 'मी आणि माँ' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकातून तिने अनेक खुलासे केले आहेत.   

10/15

आईच्या निधनानंतर दिव्या डिप्रेशनमध्ये गेली होती. यातून बाहेर पडण्यासाठी तिला उपचार घ्यावे लागले होते. तिला हिप्नोथेरपीहीची मदत घ्यावी लागली होती. 

11/15

दिव्याला शालेय जीवनात चांगले मार्क मिळायचे. पण एकदा तिला गणिताच्या पेपरमध्ये कमी मार्कं मिळाले तेव्हा आईने तिला कानशिलात मारली होती. तो त्याच्या आयुष्यातील पहिला आणि शेवटचा मार होता. 

12/15

दिव्याने फाळणीचा काळ पाहिला आहे. ती पाच वर्षांची होती तेव्हा स्टेशनवर चार दिवस आजी आजोबांसोबत उपाशी असताना ट्रेनची वाट पाहत होती. त्यावेळी स्टेशनवर तिला एक मट्ठी पडलेली दिसली ती उचायला गेली आणि ट्रेन सुरु झाली. त्यावेळी तिच्या आजोबांनी त्याला ओढत नेत ट्रेनमध्ये बसवलं आणि मट्ठी तिथेच राहिली. 

13/15

ती चार वर्षांची होती तेव्हा अमिताभ बच्चन यांचा डॉन हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळी दिव्या 'खाके पान बनारस वाला' गाण्यावर बिग बींची स्टाइल मारत डान्स करायची. 

14/15

तिच्या आयुष्यातील अजून एक धक्कादायक घटना आहे. 2005 मध्ये अॅमस्टरडॅममधील आयफा अवॉर्डसाठी गेली असताना रात्रीच्या वेळी आईसोबत हिंडत हिंडत ती रेड लाईट एरियात पोहोचली. तिच्याजवळ कॅमरा होता ज्यात ती फोटो काढत होती. त्या परिसरात फोटो काढण्यावर बंदी होती, त्यावेळी काही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला तिच्या आणि आईच्या मागे धावू लागल्या. त्या दोघींनी कसाबसा आपला जीव वाचवला.

15/15

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिव्याचं लेफ्टनंट कर्नल संदीप शेरगिल यांच्याशी साखरपुडा झाला होता.  पण विविध कारणांमुळे त्यांच्यात अंतर वाढू लागलं आणि त्यांच्यातील नातं तुटलं. यानंतर तिचा प्रेमावरील विश्वास उडला आणि तिने कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आज वयाच्या 46 वर्षीही दिव्या एकटी आहे.