डेंग्यू रुग्णांमध्ये प्लेटलेट्स झपाट्याने वाढतील, आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

Platelets Increase: डेंग्यू रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईची पाने प्रभावी ठरतात. पपईच्या पानांमध्ये एंजाइम असतात जे शरीरातील प्लेटलेटची संख्या वाढवतात. यासाठी पपईची पाने धुवून ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. यानंतर ते गाळून घ्या आणि रस वेगळा करा. पपईच्या पानांचा रस कडू असला तरी प्लेटलेट्स झपाट्याने वाढवतो.

Pravin Dabholkar | Aug 27, 2023, 07:24 AM IST

Platelets Increase: प्लेटलेटचे प्रमाण कमी असणे हे डेंग्यूच्या सर्वात सामान्य समस्येपैकी एक आहे. डेंग्यू रुग्णांच्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. आहारात अशा कोणत्या पदार्थांचा समावेश केल्याने शरीरातील प्लेटलेट काउंट वेगाने वाढेल? याबद्दल जाणून घेऊया. 

1/6

डेंग्यू रुग्णांमध्ये प्लेटलेट्स झपाट्याने वाढतील, आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

Platelets will increase rapidly in dengue patients Healthy Diet Tips in Marathi

Platelets Increase: पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. वेळीच खबरदारी न घेतल्यास लवकरच लोक डेंग्यूला बळी पडतात. डेंग्यूची सुरुवातीची लक्षणे विषाणूजन्य तापासारखी असतात. पण नंतर ही समस्या गंभीर बनत जाते. 

2/6

डेंग्यू रुग्णांच्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी

Platelets will increase rapidly in dengue patients Healthy Diet Tips in Marathi

प्लेटलेटचे प्रमाण कमी असणे हे डेंग्यूच्या सर्वात सामान्य समस्येपैकी एक आहे. डेंग्यू रुग्णांच्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. आहारात अशा कोणत्या पदार्थांचा समावेश केल्याने शरीरातील प्लेटलेट काउंट वेगाने वाढेल? याबद्दल जाणून घेऊया. 

3/6

पपईची पाने

Platelets will increase rapidly in dengue patients Healthy Diet Tips in Marathi

डेंग्यू रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईची पाने प्रभावी ठरतात. पपईच्या पानांमध्ये एंजाइम असतात जे शरीरातील प्लेटलेटची संख्या वाढवतात. यासाठी पपईची पाने धुवून ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. यानंतर ते गाळून घ्या आणि रस वेगळा करा. पपईच्या पानांचा रस कडू असला तरी प्लेटलेट्स झपाट्याने वाढवतो.

4/6

गिलॉय

Platelets will increase rapidly in dengue patients Healthy Diet Tips in Marathi

आयुर्वेदात गिलॉयने अनेक आजारांवर उपचार शक्य आहे. डेंग्यूच्या समस्येतही गिलॉयचे सेवन फायदेशीर ठरते. प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी तुम्ही गिलॉय पाण्यात उकळून पिऊ शकता. याशिवाय गिलॉयच्या गोळ्याही बाजारात उपलब्ध आहेत. गिलॉयच्या सेवनाने प्लेटलेट्स लवकर वाढतात.

5/6

गहू घास

Platelets will increase rapidly in dengue patients Healthy Diet Tips in Marathi

व्हीटग्रास सुपरफूडमध्ये गणला जातो, त्यात अमीनो अॅसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी तुम्ही गव्हाचा रस देखील घेऊ शकता. तुम्ही घरच्या घरी गव्हाचा रस बनवू शकता किंवा त्याची पावडर पाण्यात मिसळून पिऊ शकता.

6/6

आवळा

Platelets will increase rapidly in dengue patients Healthy Diet Tips in Marathi

व्हिटॅमिन सी समृद्ध आवळा शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासही उपयुक्त ठरतो. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा त्याची पावडर देखील घेऊ शकता. आवळ्याचा आहारात अनेक प्रकारे समावेश केला जाऊ शकतो.