बीएमसीच्या कारवाईनंतर कंगनाने पहिल्यांदा पाहिलं तिचं ऑफिस
कंगनाची पहिली प्रतिक्रिया
Dakshata Thasale
| Sep 11, 2020, 09:40 AM IST
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने गुरूवारी आपल्या ऑफिसला भेट दिली. बीएमसीच्या कारवाईनंतर पहिल्यांदाच तिने तिचं ऑफिस पाहिलं. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयाची केलेली तोडफोड पाहून कंगना नाराज झाली. ऑफिसमध्ये चारही बाजूंनी तोडलेलं बांधकाम पडलं होतं.