Jio स्वस्तात लाँच करणार Laptop; सर्वच प्रतिक्षेत

Jio देशात नवीन आणि स्वस्त लॅपटॅप आणण्याच्या तयारीत आहे.

Mar 06, 2021, 16:06 PM IST

रिलायंस ग्रुप  कंपनी लवकरच Jio देशात नवीन आणि स्वस्त लॅपटॉप आणण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या स्वस्त लॅपटॉपची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. स्वस्त Jio लॅपटॉपची बातमी प्रथम 3 वर्षांपूर्वी आली. मात्र आता Jio कंपनी पुन्हा स्वस्त लॅपटॉपमुळे चर्चेत आली आहे. 

1/5

Reliance Jio लवकरच स्वस्त लॅपटॉप लाँच करणार आहे. मे महिन्यात Reliance Jio  कंपनीचा स्वस्त लॅपटॉप बाजारात दाखल होणार आहे.   

2/5

जिओचा लॅपटॉप Qualcomm Snapdragon 665 (SM6125) प्रोसेसरवर काम करणार आहे.  जो 2019 मध्ये लाँच करण्यात आला आहे.   

3/5

Jio कंपनी JioBook या नावाने लॅपटॉप लाँच करण्याची शक्यता आहे.   

4/5

परंतु, या लॅपटॉची किंमत काय असेल हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.   

5/5

नवीन लॅपटॉपच्या बातमीमुळे जिओ पुन्हा एकदा बाजारात चर्चेचा विषय बनला आहे.