जनता कर्फ्यू : मोदींच्या आवाहनानंतर जम्मू-काश्मीरच्या रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट
कोरोना व्हायरसची दहशत
कन्या कुमारीपासून ते जम्मू-काश्मीरच्या टोकापर्यंत जनता कर्फ्यूमुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. कोरोना व्हायरस या धोकादायक विषाणूपासून वाचण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आलं आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांनी 'जनता कर्फ्यू'चं पालन करण्यास सांगितलं आहे.रविवारी म्हणजेच २२ मार्च २०२०ला सकाळी ७ वाजल्यापासून या 'जनता कर्फ्यू'ला सुरुवात झाली. तर उद्या पहाटेपर्यंत 'जनता कर्फ्यू' कायम असणार आहे.