हिवाळ्यात तुमच्या फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होतेय? फक्त या 5 टिप्स फॉलो करा, होईल फायदा

हिवाळ्यात फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते. थंडीमुळे बॅटरीची क्षमता कमी होते आणि फोन लवकर डिस्चार्ज होऊ शकतो. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता.

तेजश्री गायकवाड | Nov 24, 2024, 08:41 AM IST

Smartphone Discharge: हिवाळ्यात फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते. थंडीमुळे बॅटरीची क्षमता कमी होते आणि फोन लवकर डिस्चार्ज होऊ शकतो. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता.

1/5

फोन गरम ठेवा

तुमचा स्मार्टफोन तुमच्या खिशात किंवा जॅकेट किंवा स्वेटरच्या खिशात ठेवा जेणेकरून ते थंड होऊ नये. स्वतःला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. पण, लक्षात घ्या तुम्हाला फोन हीटरपासून दूर ठेवायचा आहे. फोन थेट हीटरजवळ ठेवू नका कारण याचा बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.

2/5

स्क्रीन ब्राइटनेस कमी करा

फोनचा ब्राइटनेस कमी ठेवा. ऑटो ब्राइटनेस हे फिचर ऑन ठेवा जेणेकरून फोनच्या स्क्रीनची चमक आपोआप गरजेनुसार कमी जास्त  होईल. 

3/5

बॅकग्राउंड ॲप्स बंद करा

तुम्ही वापरत नसलेले ॲप्स बंद करा. यामुळे बॅटरी वाचण्यास मदत होईल. तसेच ॲप्सचे बॅकग्राउंड अपडेट्स थांबवा. ॲप्सचे बॅकग्राउंड अपडेट्स बंद केल्यानेही बॅटरी वाचू शकते.  

4/5

बॅटरीचा सेव्हर मोड चालू करा

बहुतेक स्मार्टफोन्समध्ये बॅटरी सेव्हर मोड असतो. फोनमध्ये कमी बॅटरी शिल्लक असताना हा मोड उपयुक्त ठरतो. हा मोड ऑन करून तुम्ही, तुम्ही उर्वरित बॅटरी जास्त काळ वापरू शकता. ते चालू केल्याने बॅटरीचा वापर कमी होतो.

5/5

ब्लूटूथ आणि वायफाय बंद करा

गरज नसताना किंवा तुम्ही ब्लूटूथ किंवा वाय-फाय इत्यादी सेवा वापरत नसताना ते बंद करा. ही सेवा बॅटरी वापरते. ते बंद करून तुम्ही बॅटरी वाचवू शकता.