कंगणाने मुंबई सोडली... BMC चा हातोडा पडलेला बंगला विकला! कोट्यवधी कमवले; विक्रीची किंमत...

Mumbai Real Estate Kangana Ranaut Bungalow: मागील बऱ्याच काळापासून अभिनेत्री कंगणा राणौत मुंबई सोडणार अशी जोरदार चर्चा होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झालं असून तिने तिचा बंगला मोठ्या नफ्यासहीत विकता आहे. नेमका हा बंगला आतून कसा आहे आणि तिने तो कितीला घेतलेला आणि कितीला विकला जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Sep 10, 2024, 08:13 AM IST
1/11

kanganaranautbungalow

अभिनेत्री कंगणाने केलेल्या या व्यवहाराचे कागदपत्रं समोर आली आहेत. जाणून घेऊयात नेमका कितीला विकला तिने हा बंगला...

2/11

kanganaranautbungalow

राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणौत तिच्या ज्या बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामामुळे चर्चेत आलेली. तो बंगला तिने विकला आहे.   

3/11

kanganaranautbungalow

कंगनाने आपला हा मुंबईमधील पाली हिल येथील बंगला विकला असून या व्यवहारासंदर्भातील कागदपत्रं 'झॅपकी'च्या हाती लागली असून याच आधारे या बंगल्यासाठी कंगनाला किती पैसे मिळाले याची माहिती समोर आली आहे. 

4/11

kanganaranautbungalow

खरं तर कंगाने हा बंगला 2017 साली सप्टेंबर महिन्यामध्ये हा बंगला विकत घेतला होता. मात्र आता केलेल्या सौद्यामध्ये कंगनाला या बंगल्याच्या विक्रीमधून मोठा फायदा झाल्याचं स्पष्ट होत आहे.   

5/11

kanganaranautbungalow

बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत कंगनाच्या याच बंगल्याचा काही भाग बीएमसीच्या अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या विभागाने पाडला होता.    

6/11

kanganaranautbungalow

कंगनानेच या बंगल्यातील काही फोटो मध्यंतरी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते. या बंगल्यामध्येच कंगणाचं प्रोडक्शन हाऊस 'मणिकर्णिका फिल्मस'चं ऑफिस होतं. आता हे ऑफिस कुठे हलवलं जाणार हे स्पष्ट झालेलं नाही.

7/11

kanganaranautbungalow

कंगनाच्या 'मणिकर्णिका फिल्मस'चं हे ऑफिस शबनम गुप्ता यांनी डिझाइन केलं आहे. या बंगल्यामध्ये लाकडी शिड्या, कामासाठी ऐसपैस जागा, एडिटींग स्टुडीओ, चर्चेसाठी मोठा हॉल, कॉन्फरन्स रुम असा सेटअप कंगणाच्या या कंपनीच्या ऑफिसमध्ये आहे.  

8/11

kanganaranautbungalow

कंगनाच्या या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर बैठकीसाठी मोठा हॉल आहे. तसेच या मजल्यावर मोठं बाथरुम, शॉवर, वॉर्डरोब आणि ड्रेसिंग एरिया आहे. कंगनाचा हा बंगला पर्शियन कॅफेसारखा वाटतो. मात्र त्याला इंडियन फर्निचरच्या माध्यमातून इंडियन टच देण्यात आला आहे.

9/11

kanganaranautbungalow

बंगला 285 स्वेअर मीटरवर असून एकूण कन्ट्रक्शन एरियाचा विचार केल्यास तो 3075 स्वेअरफूट इतका आहे. या बंगल्याला 565 स्वेअर फुटांची पार्किंगही आहे.  या बंगल्याच्या व्यवहारासंदर्भात समोर आलेल्या कागदपत्रांनुसार बंगल्याचा सौदा 5 सप्टेंबर रोजी झाला आहे. या व्यवहारासाठी 1.92 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून मोजली आहे. तर रजिस्ट्रेशनसाठी 30 हजार मोजण्यात आले आहेत.  

10/11

kanganaranautbungalow

कंगनाकडून हा बंगला कामालिनी होर्डींग्समधील पार्टनर असलेल्या श्वेता भाटीजा यांनी विकत घेतला आहे. ही कंपनी तामिळनाडूमधील कोइम्बतूर येथील आहे. कंगनाने हा बंगला 12 कोटींच्या नफ्यासहीत 32 कोटींना विकला आहे. 20 कोटी रुपयांना तिने 2017 मध्ये बंगला विकत घेतला होता.   

11/11

kanganaranautbungalow

हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून निवडणूक लढताना मे 2024 मध्ये कंगनाने तिच्याकडील एकूण संपत्ती 91 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं. यामध्ये 28.7 कोटी जंगम संपत्ती असून 62.9 कोटी रुपये स्थावर संपत्ती आहे.