Mukta Barve Birthday : 'या' एका कारणामुळे मुक्ता बर्वे अविवाहित, स्वतःच केला खुलासा

Mukta Barve Birthday : 'नाच गं घुमा' सिनेमातील राणी म्हणजे मुक्ता बर्वेचा आज 45 वा वाढदिवस. मुक्ता बर्वे का आहे अजून अविवाहित?

मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आज 17 मे रोजी 45 वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने स्वतःची छाप पाडणारी अभिनेत्री मुक्ता प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. मराठीतील आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणून ओळखलं जातं. मुक्ता बर्वे वयाच्या 45 मध्येही अविवाहित आहे. यामागचं कारण काय? स्वतः मुक्तानेच केला खुलासा 

1/7

मुक्ताचा जन्म

 Why Mukta Barve Still Single

मुक्ता बर्वेचा जन्म हा पुण्यात झाला आहे. मुक्ताला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. मुक्ताच्या घरी तिचे आई-बाबा आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. 

2/7

बालनाट्य

 Why Mukta Barve Still Single

नाट्यलेखिका असलेल्या मुक्ताच्या आईने ‘रुसू नका फुगू नका’ हे मराठी नाटक लिहीले आणि मुक्ताला यात काम दिले. या बालनाट्यातील 'भित्रा ससा' आणि 'परी राणी' या दोन्ही भूमिका मुक्ताने केल्या. 

3/7

वयाच्या 15 व्या वर्षी

 Why Mukta Barve Still Single

मुक्ताने वयाच्या 15 व्या वर्षी रत्नाकर मतकरीं च्या 'घर तिघांचे हवे' या नाटकात काम केले. त्यानंतर मुक्ताने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. 

4/7

मुक्ताला ओळख

 Why Mukta Barve Still Single

पण, मुक्ताला खरी ओळख ‘जोगवा’ या चित्रपटाने दिली. यानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील तिने साकारलेली राधा रसिकांच्या पसंतीस उतरली.  ‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटात तिने साकारलेली सडेतोड, प्रॅक्टीकल गौरी सगळ्यांनाच आवडली.  

5/7

मुंबई-पुणे-मुंबई

 Why Mukta Barve Still Single

मुक्ता आणि स्वप्नील जोशी या जोडीचे प्रचंड चाहते आहेत. या जोडीने एकत्र अनेक सिनेमे आणि मालिका देखील केल्या. महत्वाचं म्हणजे ते सगळंच प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. त्यातलाच सगळ्यात जास्त गाजणारा चित्रपट किंवा फ्रेंचायजी म्हणजे मुंबई- पुणे- मुंबई'. या चित्रपटाचे आतापर्यंत 3 भाग आहेत. प्रेक्षक चौथ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. 

6/7

नाच गं घुमा

 Why Mukta Barve Still Single

नुकताच मुक्ताचा 'नाच गं घुमा' हा सिनेमा रिलिज झाला. यामध्ये मुक्ताने साकारलेली राणी प्रेक्षकांना भावली. मुक्ताने या सिनेमातून 'मदतनीस' आणि घराचं असलेलं नातं मांडलं आहे. सध्या हा सिनेमा प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.   

7/7

लग्न का केलं नाही

 Why Mukta Barve Still Single

एका मुलाखतीत मुक्ता बर्वेने स्वतःच अद्याप अविवाहित का राहिल्याचं कारण सांगितलं आहे. मुक्ता म्हणाली की, ‘मी आत्ता जितकी सुखी आणि आनंदी आहे त्यापेक्षा माझा आनंद आणि सुख वाढणार असेल, तरच मी लग्न करेन’.