'मी त्यांना म्हणालो, तुम्ही आता..', मनोज बाजपेयीचा वडिलांबरोबरचा अखेरचा संवाद; स्पॉटबॉय रडला

Manoj Bajpayee Last Conversation With His Father: एक अष्टपैलू आणि उत्तम अभिनेता म्हणून मनोज बाजपेयीला मनोरंजनसृष्टीत ओळखलं जातं. मनोजच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये त्याने अनेक खसता खाल्ल्या आहेत. त्याच्या खासगी आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगाबद्दल त्याने नुकताच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं. तो नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | May 14, 2024, 15:28 PM IST
1/10

Manoj Bajpayee Last Conversation With His Father

पालकांचा मृत्यू हा जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी खासगी आयुष्यातील सर्वात वेदनादायी क्षण असतो. त्यातही आई आणि वडील अल्पावधीत एकामोमाग एक सोडून गेल्यास होणारं दु:ख फार मोठं असतं. अशाच दु:खाला अभिनेता मनोज बाजपेयी सामोरे गेला आहे. त्यानेच यासंदर्भातील अनुभव नुकत्याच एका मुलाखती सांगितलं. 

2/10

Manoj Bajpayee Last Conversation With His Father

अवघ्या 6 महिन्यांच्या कालावधीत मनोज बाजपेयीच्या आईचे आणि वडिलांचे निधन झाले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनोजने पालकांच्या निधनानंतरची परिस्थिती कशी हाताळली हे सांगितलं आहे. मनोजने त्याच्या वडिलांबरोबर झालेलं शेवटचं संभाषण काय होतं याबद्दल खुलासा केला.

3/10

Manoj Bajpayee Last Conversation With His Father

मनोजचे वडील आर. के. बाजपेयी यांना मनोजने आजारी तुम्ही सावकाश मृत्यूला समोरे जा असं म्हटल्याचं सांगितलं. मनोजचे वडील बऱ्याच काळापासून आजारी होते. तसेच मनोजने त्याची आई गिता देवी यांची इच्छाशक्ती किती मजबूत होती याबद्दलही भाष्य केलं होतं. त्यांनी डॉक्टरांना मृत्यू लवकर यावा म्हणून विचारणा केली होती. आपल्या मुलांवर आपलं ओझं नको अशी त्यांची इच्छा होती, अशी माहिती मनोजने दिली.  

4/10

Manoj Bajpayee Last Conversation With His Father

सिद्धार्थ खन्नाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोजने, "माझे वडील आणि माझ्यामध्ये फार घनिष्ट संबंध होते. मी त्यांना फार मानायचो. माझी भावंडं त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत होते यासाठी मी स्वत:ला नशिबवान समजतो. मी त्यावेळी केरळमध्ये 'किलर सूप'चं शुटींग करत होतो. मी त्यांना सांगायचो की मी शुटींगसाठी चाललो आहे आणि ते संपल्यानंतर मी परत येईन," अशी आठवण सांगितली.  

5/10

Manoj Bajpayee Last Conversation With His Father

आपण आपल्या वडिलांना देहत्याग करण्यास सांगितलं तो अनुभव फारच दु:ख होता असं मनोज म्हणाला. "एके दिवशी माझ्या बहिणीने मला कॉल केला आणि माझ्या वडिलांचा जीवन प्रवास संपत आल्याचं सांगितलं. मात्र डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ते जगण्यासाठी संघर्ष करत होते. माझा त्यांच्यावर फार जीव असल्याने मी त्यांच्याशी बोलून त्यांना समजवावं असं तिला वाटत होतं. मी सांगितल्यास ते प्राण सोडायला तयार होतील असं बहिणीला वाटत होतं," असं मनोज म्हणाले.

6/10

Manoj Bajpayee Last Conversation With His Father

"मला हा फोन आला तेव्हा मी माझ्या व्हॅनिटीमध्ये होतो आणि 'किलर सूप'चं शुटींग सुरु असल्याने माझ्याबरोबर माझा स्पॉटबॉय होता. मी त्याच्यासमोरच माझ्या वडिलांशी बोलत होतो. मी त्यांना 'बाबा कृपा करुन तुम्ही जा (देहत्याग करा), वेळ झाली आहे,' असं म्हणालो. माझ्यासाठी हा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव होता. माझं बोलणं ऐकून स्पॉटबॉय रड लागला. मी त्याला टाळून सीन देण्साठी निघून गेलो. तो माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या वडिलांचं निधन झालं," असं मनोजने सांगितलं. "मी भेटेन या आशेने त्यांनी प्राण सोडला नव्हता. जेव्हा त्यांनी फोनवर दिर्घकाळानंतर माझा आवाज ऐकला तेव्हा त्यांनी प्राण सोडले," अशंही मनोज म्हणाला.   

7/10

Manoj Bajpayee Last Conversation With His Father

वडिलांच्या निधनानंतर सहा महिन्यांच्या आतच आईने प्राण सोडल्याचंही मनोजने सांगितलं. वडिलांच्या निधनानंतर आईने दिल्लीमधून आपल्या मूळ गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथे गेल्यानंतर तिला पोटाच्या कॅन्सरचा त्रास होऊ लागला आणि तिला पुन्हा दिल्लीत हलवावे लागले.

8/10

Manoj Bajpayee Last Conversation With His Father

"तिच्या पोटात कॅन्सर पुन्हा वाढू लागला. ती गावात असतानाच याला सुरुवात झाली. आम्हाला याची कल्पना नव्हती की तिला याबद्दल काहीच ठाऊक नाही. तिच्या पोटात पू निर्माण झाला आणि तो तिच्या बेंबीतून बाहेर येऊ लागला. एवढं असतानाही ती युट्यूबवर व्हिडीओ पाहून स्वत:वर उपचार करण्याचा प्रयत्न करायची. ती एवढी कणखर होती," असं मनोज म्हणाला. 

9/10

Manoj Bajpayee Last Conversation With His Father

आईला कॅन्सरसंदर्भात कळाल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय होती याबद्दलही मनोजने भाष्य केलं. "आपल्याला आता आपल्या मुलांवर अवलंबून रहावं लागेल याची तिला जाणीव झाली तेव्हा तिने माझ्या बहिणीला डॉक्टरांना मला काहीतरी असं द्यायला सांग की ज्यामुळे मी आरामात मरणाला सामोरं जाईल असं सांगितलं," असं मनोज म्हणाला.

10/10

Manoj Bajpayee Last Conversation With His Father

"मला कोणावरही अवलंबून राहायचं नाहीये. त्याऐवजी मरण स्वीकारणं मला पसंत आहे. असं ती म्हणाली आणि आम्हाला सोडून गेली. त्यामुळे माझं पालनपोषण अशाच वातावरणात झालं आहे जिथे आम्ही पराभव मानत नाही, शरण जात नाही, कोणावर अवलंबून असतं नाही, कोणाकडून काही अपेक्षा ठेवत नाही तरी आम्ही फार नम्रपणे वागतो," असं मनोजने आवर्जून नमूद केलं.