बाबिल खानचा ब्रेकअप! कोण आहे त्याच्या मिठीतली 'ही' मिस्ट्री गर्ल? जिच्या नसण्यानं अभिनेता इतका भावूक

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खाननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. बाबिलनं त्याच्या अभिनयानं सगळ्यांच्या मनात छाप सोडली आहे. वेब सीरिजमध्ये त्यानं कमालीचं काम केलंय. त्याच्या खासगी आयुष्यात हळू-हळू तो जसा यशस्वी होतोयं, तितकंच त्याचं खासगी आयुष्य देखील चर्चेत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून त्यानं ब्रेकअपची माहिती दिल्याचे म्हटले जात आहे. 

Diksha Patil | May 14, 2024, 15:06 PM IST
1/7

बाबिलनं शेअर केली पोस्ट

बाबिलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यानं चार फोटो शेअर केले आहेत. त्यानं शेअर केलेले हे फोटो आणि कॅप्शननं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 

2/7

ब्रेकअपची बातमी

बाबिलनं त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत तिची न कळत सगळ्यांशी ओळख करुन दिली आहे. त्यातून त्यांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे. 

3/7

फोटोला भावूक कॅप्शन

बाबिलनं हे फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की 'मला वाटत नाही की मूव्ह ऑन करणं (आयुष्यात पुढे जाणं) म्हणजे हे लपवण्याचा प्रयत्न करणं की तुम्ही कशावर किंवा कोणावर प्रेम केलं. ते आपल्या जीवनात आणि आयुष्याचा भाग बनतात.'

4/7

आठवणी सांगत म्हणाला...

बाबिल म्हणाला,'जेव्हा तू हसते तेव्हा मला तुला आवाज आवडतो. जेव्हा तू जाणारा तेव्हा माझं हे हसू घेऊन जा. मला तुला पाहायला मिळतं. तू कसा श्वास घेते हे माझ्या लक्षात राहिल. मला तुझा हात पकडायला आवडतं. मला आठवण आहे की तुला तुझा टॅट्यू आवडत नाही. तुझी आठवण काढायला मला आवडतं.'

5/7

वडिलांकडे जाण्याची इच्छा

काही दिवसांपूर्वी बाबिलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर करत त्यात म्हटले होते की 'अनेकदा असं वाटतं की सगळं काही सोडू आणि बाबाकडे जाऊ.'

6/7

बाबिलचं काम

बाबिलनं 'कला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यासोबत तो त्यानं के के मेनन, आर माधवन, दिव्येंदु आणि इतक कलाकारांसोबत 'द रेल्वे मॅन' या सीरिजमध्ये काम केलं. त्यानंतर तो शूजीत सरकारच्या 'द उमेश क्रॉनिकल्स' मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. 

7/7

बाबिलचे चाहते

बाबिलचे इन्स्टाग्रामवर 1.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.