'नाहीतर कुठलीही तक्रार करण्याचा आपल्याला अधिकार नाही...' मराठी कलाकारांनी मतदान करत जनतेलाही केलं आवाहन

मराठी कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कलाकारांनी इतरांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत.

| Nov 20, 2024, 14:30 PM IST

Maharashtra Election 2024 : मराठी कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कलाकारांनी इतरांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत.

1/10

'जय महाराष्ट्र' म्हणत सायली संजीवने सोबत दोन फोटो जोडून मतदानाचा फोटो पोस्ट केला आहे. 

2/10

करा आज योग्य selection, Today is the day of election, समाजात हवं असेल जर perfection तर करू नका या संधी चं rejection, GO VOTE NOW जाताय ना ? असा म्हणतं सोनाली कुलकर्णीने संपूर्ण कुटुंबासोबत मतदान  केले.   

3/10

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मतदानाचा हक्क बजावत फोटो शेअर करत लिहिलं की, 'मी मतदान केलं. तुम्ही?…लक्षात ठेवा, बोटं उगारायचा अधिकार हा बोटावर शाई लावल्यावरच मिळतो. आज मतदानाचा हक्क प्राधान्याने आणि जबाबदारीने बजावावा.'

4/10

लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक, लेखक हेमंत ढोमेने, 'माझं मत…ऐक्यासाठी… विकासासाठी… भयमुक्त सुरक्षित वातावरासाठी! माझं मत शेतकऱ्यांसाठी… दुर्बल घटकांसाठी! माझं मत जातीय सलोख्यासाठी… महाराष्ट्रधर्मा साठी! शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी!' असा फोटोला कॅप्शन देत लोकांनाही आवाहन केलं. 

5/10

अभिनेता अभिजीत केळकरने फोटो पोस्ट करत लिहले की 'मी माझं कर्तव्य केलं, माझी जबाबदारी पार पाडली, माझा हक्क बजावला... मी आशावादी आहे...'

6/10

'आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. आता पुढील पाच वर्ष, आपण फसवले गेलो, ही भावना मनात न येता, सुखा-समाधानाची जावोत हीच राज्यकर्त्यांकडून अपेक्षा.' असं म्हणत अभिनेते सुनील बर्वे यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केलं आहे. 

7/10

'मतदान नक्की करा..नाहीतर कुठलीही तक्रार करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. मतदार ‘राजा’ फक्त मतदानाच्या दिवशीच असतो. तो हक्क/अधिकार/कर्तव्य नक्की बजावा!' असं चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता समीर विध्वंस फोटो पोस्ट करत म्हणाले. 

8/10

मराठी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री स्पृहा जोशीनेही स्वतः मतदान केलेला फोटो पोस्ट केला आहे. 

9/10

"मतदान हे आपले कर्तव्य आणि हक्क आहे. प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडून योग्य नेतृत्वाला आपले अमूल्य मत द्यावे, जेणेकरून लोकशाही आणखी सशक्त होईल.!" असं आवाहन करून अभिनेता सुशांत  शेलारने पोस्ट केली. 

10/10

'कळकळीचं आवाहन…अजिबात कंटाळा न करता, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा.' असं म्हणतं प्राजक्ता माळीने स्वतः मतदान केल्याचा फोटो टाकली आणि मतदारांना आवाहनही केलं.