PHOTO: साताऱ्यातील आश्चर्यकारक ठिकाण! सडा वाघापूरचा उलटा धबधबा, एकदा पाहल तर पाहतच रहाल

Monsoon Tourist Places in Satara: सातारा जिल्हयातील सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होतेय... निसर्गानं नटलेला हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण ठरतोय...  सडा वाघापूरचा उलटा धबधबा... एकदा तरी नक्की भेट द्या.

| Jul 25, 2024, 15:27 PM IST
1/7

 पुण्यातील जुन्नरजवळील नाणेघाट येथे असलेला उलट्या दिशेने प्रवाहित होणारा कोकणकडा धबधबा प्रसिद्ध आहे. असाच धबधबा साताऱ्यात आहे.   

2/7

विस्तीर्ण पठार, धुक्यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्क्या, दाट धुके, धुक्यात हरवलेला रस्ता व कौलारु घरे, थंडगार हवा, सोबत थुईथुई पाऊस, पठारावरुन निसर्गाचे नयनरम्य दृष्य दिसते. 

3/7

उलटया धबधब्याचा अविष्कार वाऱ्याच्या दाबावर अवलंबुन आहे. वाऱ्याचा दाब असल्यास अतिशय मनमोहक व डोळयाचे पारणे फेडणारा नजारा पहायला मिळतो.   

4/7

निसर्गाचा हा आविष्कार पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सडा वाघापूर येथे येत आहेत.  

5/7

चाळकेवाडी पाटण रस्त्याला असणाऱ्या या धबधब्याला दरवर्षी मोठ्या संख्येने भेट देत असतात.

6/7

वाऱ्याच्या वेगानं सडा वाघापूर धबधब्याचं पाणी जोरात मागे येतं. त्यामुळे हा उलटा धबधबा तयार होतो.

7/7

सातारा जिल्हयातील प्रसिद्ध असलेला सडा वाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते आहे. निसर्गाचा अनोखा आविष्कार असलेला हा धबधबा पर्यटकांचा आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे.