Pankaja Munde Net Worth: पंकजा मुंडेंवर पावणेतीन कोटींचं कर्ज! 450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; एकूण संपत्ती..

Pankaja Munde Net Worth: बीड मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या पंकजा यांनी त्यांच्या संपत्तीसंदर्भातील तपशील या उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिला आहे. जाणून घेऊयात पंकजा यांची एकूण संपत्ती किती आहे.

Swapnil Ghangale | Apr 25, 2024, 17:50 PM IST
1/9

Pankaja Munde Property Details

बीड मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.  

2/9

Pankaja Munde Property Details

उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये पंकजा मुंडेंनी आपल्या संपत्तीचं विवरणाचा सविस्तर तपशील दिला आहे.  

3/9

Pankaja Munde Property Details

या शपथपत्रामध्ये पंकजा यांनी त्यांची स्थूल मालमत्ता 6 खोटी 17 लाख 58 हजार 708 रुपये असल्याचं म्हटलं आहे.  

4/9

Pankaja Munde Property Details

तर पंकजा यांनी त्यांची स्थावर मालमत्ता 4 कोटी 45 लाख 24 हजार 760 रुपये असल्याचं जाहीर केलं आहे.  

5/9

Pankaja Munde Property Details

आपल्यावर 2 कोटी ७४ लाख 89 हजार 518 रुपये कर्ज असल्याचं पंकजा यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.   

6/9

Pankaja Munde Property Details

पंकजा यांनी त्यांच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिण्यांबद्दलही माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे.   

7/9

Pankaja Munde Property Details

आपल्याकडे 450 ग्रॅम सोनं असून 4 किलो चांदी असल्याचं पंकजा यांनी प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं आहे.  

8/9

Pankaja Munde Property Details

पंकजा यांच्याकडे असलेल्या इतर जडजवाहिराची किंमत 2 लाख 30 हजार रुपये इतकी असल्याचं जाहीर केलं आहे.  

9/9

Pankaja Munde Property Details

पंकजा मुंडेंची एकूण संपत्ती 10 कोटी 62 लाख 83 हजार रुपये इतकी आहे.