Mangi Tungi: चीनला टक्कर देतेय महाराष्ट्रातील GREAT WALL! मांगी तुंगीला जोडणारी 4500 पायऱ्यांंची भिंत

महाराष्ट्रातील GREAT WALL चीनला टक्कर देते. जाणून घेऊया महाराष्ट्रातील या अनोख्या पर्यटनस्थानविषयी.

Feb 19, 2025, 23:55 PM IST

Mangi Tungi:  ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ ही सर्वांनाच जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. याच ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ ला टक्कर देतेय महाराष्ट्रातील GREAT WALL. महाराष्ट्रातील मांगी-तुंगी किल्ल्याजवळ ही भिंत आहे. 

1/10

मांगी-तुंगी किल्ला हा  4000 फुट उंचीवर असलेला  गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.  मांगी तुंगीला जोडणारी 4500 पायऱ्यांंची भिंत आहे.

2/10

भिलवाडी गावात धर्मशाळा आहे. येथे 10 ते 15 जणांची राहण्याची सोय होते. भिलवाडी गावातच जेवणाची सोय होते. गावातूनच पाणी घेणे आवश्यक आहे कारण गडावर पाणी नाही. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून 3 तास लागतात.  

3/10

सेलबारी पर्वत रांगेत मांगी-तुंगी, घाण्यागड, तांबोळ्या, न्हावीगड, धामण्या-वघाई, गवळण, नांद्या, जिभ्या, शेंदोड , हनुमान ही  गड -दुर्गपर्वत शृंखला येते थेट गुजरात राज्यातील पूर्णा  अभयारण्यातील डोंगर रांगेत संपते.   

4/10

बागलाण सुपीक सध्न आणि संपन्न असा मुलुख सह्याद्रीच्या उत्तर-दक्षिणेची सुरुवात होते. ती या बागलखेड (बागलाण) विभागातुनच होते. येथे असणाऱ्या दुहेरी पूर्व-पश्चिम रांगेला सेलबारी-डोलबारी असे संबोधण्यात येते.  

5/10

 भिलवाडीमध्येच जैनांची आदिनाथ, पार्श्वनाथ यांची मंदिरे आहेत. याला सुद्धा मांगी-तुंगीच म्हणतात.   

6/10

मांगी-तुंगी ही जैन लोकांची तीर्थक्षेत्रे.  जगातील सर्वात उंच 108 फूट अखंड पाषाणातील जैन मूर्ती येथे आहे.   

7/10

00 पायऱ्या चढल्या नंतर 3 गुहा व  3 जैन  लेण्या  आहेत   

8/10

मांगी-तुंगी शिखर येथून 2 किमीवर आहे.  मांगीतुंगी वर जाण्यासाठी एकूण 4500 पायऱ्या आहेत.   

9/10

भिलवाडी हे मांगीतुंगीच्या पायथ्याचे गाव. मांगी-तुंगी सुळक्यावर जाण्यासाठी गावातूनच रस्ता आहे. वीस मिनिटे रस्त्यावरून चालत गेल्यावर पुढे पायऱ्या लागतात. सुमारे २००० पायऱ्यांचा चढ चढून गेल्यावर आपण एका कमानीपाशी पोहोचतो. येथून डावीकडे गेलो तर मांगी आणि उजवीकडे गेलो की तुंगी.  

10/10

मांगी-तुंगीला जायचे असल्यास नाशिक वरून सटाणामार्गे ताहराबाद येथून जाता येते. गुजरात मधून यायचे झाल्यास नीलमोरा रेल्वेस्थानकावरून अहुआ मार्गे ताहराबाद येथे पोहचता येते. ताहराबाद वरून भिलवाडी पर्यंत येण्यासाठी एसटी बस मिळतात.