आपल्या भावामागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रियंका गांधी

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांना शिक्षण-रोजगारापासून ते नियोजन आयोगापर्यंत अनेक प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आले यावेळी. त्यांना त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलही काही प्रश्न विचारण्यात आले...

Apr 05, 2019, 15:18 PM IST

यातीलच एक प्रश्न होता राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याविषयी... या प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधींनी आपल्या लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला.

1/7

लहानपणीच्या आठवणींना उजाळा

लहानपणीच्या आठवणींना उजाळा

आपल्या राजकीय कारकीर्दीत आपल्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या बहिणीविषयी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या... 

2/7

नेहमी राखी हातात असते...

नेहमी राखी हातात असते...

'मी स्वत:च एक नियम बनवलाय... माझ्या हातातली राखी तुटून पडेपर्यंत ती मनगटावरचं असते... मी राखी कधीच काढत नाही. आत्ताही माझ्या हातात राखी आहे आणि ही राखी पुढच्या रक्षाबंधनापर्यंत तशीच राहील...' असं त्यांनी आपल्या बहिणीविषयी आपलं प्रेम व्यक्त करताना म्हटलं. 

3/7

भावा - बहिणीचं घट्ट नातं

भावा - बहिणीचं घट्ट नातं

माझी बहीण माझी खूप चांगली मैत्रीण आहे. असंच काहीसं तिनंही (सोशल मीडियावर) लिहिलंय... कारण, आम्ही आमचं आयुष्य एकत्र जगलोय, त्यामुळे आमचं नातं आणखीनच घट्ट बनलंय - राहुल गांधी

4/7

भांडण होत नाहीत कारण...

भांडण होत नाहीत कारण...

'आमच्यात भांडण होत नाहीत... ते लहानपणी व्हायचे... ती माझ्यासोबत खूप मस्करी करते... गोडधोड खाऊ घालून ती मला जाडजूड बनवायचा प्रयत्न करते...' असं सांगत आपली बहिण आपले लाड पुरवत असल्याचंही त्यांनी म्हटलं...  आमच्यात कधीच भांडणं होत नाहीत कारण एकतर ती माघार घेते किंवा मी... असंही त्यांनी म्हटलं

5/7

आमचा प्रवास एकत्रच...

आमचा प्रवास एकत्रच...

मी लहान असल्यापासून अनेक हिंसक घटना पाहिल्यात... माझ्या आजीची हत्या झाली... माझ्या वडिलांची हत्या झाली आणि आयुष्याच्या या संपूर्ण प्रवासात माझी बहिणच माझी सर्वात चांगली मैत्रीण राहिली... त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांना खूप चांगलं समजू शकतो...' असं म्हणत त्यांनी प्रियंकासोबतच्या नात्यातले पदर उलगडले

6/7

आजीची आठवण

आजीची आठवण

इंदिरा गांधी म्हणजेच आपल्या आजीची आठवण सांगताना राहुल गांधी म्हणाले, 'मी लहान असताना आजीसोबतची एक गंमतीशीर आठवण म्हणजे त्या घरी आल्या की मी पडद्यामागे लपायचो... आणि त्या समोर दिसताच त्यांच्यासमोर उडी मारून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करायचो... आणि आजीही माझ्यासोबत लहान होत घाबरल्याचं नाटक करायच्या...'

7/7

'माझा खरा मित्र'

'माझा खरा मित्र'

नुकताच, राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आपल्या भावाविषयी सोशल मीडियावर विश्वास व्यक्त करत  'माझा भाऊ, माझा खरा मित्र आहे. आणि तो एक शूर व्यक्ती आहे. वायनाडच्या जनतेने त्याच्यावर लक्ष ठेवावं. तो तुम्हाला निराश करणार नाही' असं म्हणत जनतेला साद घातली