हीच ती वेळ.... हाच तो क्षण...! क्रिकेटमध्ये घडली क्रांती; पुरुषांच्या सामन्यात 'ती' उतरली मैदानात

IPL सारखी T20 लीग असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट, क्रिकेटच्या या मैदानावर आता अनेक बदल होऊ लागलेत.

Apr 06, 2023, 19:38 PM IST

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये एक असं चित्र पाहायला मिळालं, जो कदाचित याआधी कधीही तुम्ही पाहिलं नसेल. हा फोटो पाहून तुम्हीही म्हणू शकता की, क्रांती सुरू झाली आहे.

1/5

नुकतंच भारतात महिला आयपीएलचंही आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामुळे महिला क्रिकेटला आणखी चालना मिळालीये. जगभरातील चाहते आता महिला क्रिकेटपटूंना ओळखू लागलेत. 

2/5

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान एक ऐतिहासिक क्षण पहायला मिळाला. चाहते ज्याची अनेक वर्षांपूर्वीपासून वाट पाहत होते, ते अखेर सत्यात उतरलंय.

3/5

आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात न्यूझीलंडच्या महिला अंपायर किम कॉटन यांनी अंपायरिंग करून आपलं नाव इतिहासात नोंदवलं आहे.

4/5

किम कॉटन ही ICC पुरुषांच्या टीममधील आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायर करणारी पहिली महिला अंपायर बनली आहे.

5/5

त्यामुळे आता पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये महिला अंपायर दिसल्यास आश्चर्य वाटू नये