Karwa Chauth Wishes in Marathi: करवा चौथला जोडीदाराला पाठवा शुभेच्छा

Happy Karwa Chauth Wishes in Marathi:  करवा चौथ दिवस साजरा करण्यासाठी जोडीदाराला पाठवा खास शुभेच्छा. 

करवा चौथ हा सण 20 ऑक्टोबर 2024 रोजी रविवारी साजरा होत आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत पाळतात आणि चंद्राची पूजा केल्यानंतर त्यांच्या हातातील पाणी पिऊन उपवास सोडतात. याआधी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी उठून सरगी खाऊन करवा चौथचा उपवास सुरू केला जातो. अशा परिस्थितीत, करवा चौथची सुरुवात अधिक आनंदी आणि सुंदर करण्यासाठी, तुम्ही हे प्रेम संदेश कोट्स आणि फोटो तुमच्या जोडीदारासोबत शेअर करू शकता आणि या दिवशी त्यांना शुभेच्छा देऊ शकता. 

1/8

मला चंद्रात तुझा चेहरा दिसतो चंद्राबरोबर चांदण्या...तशी मला तुझी गरज आहे. करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा

2/8

पतीच्या सुखासाठी  करवा चौथचा उपवास  करणारी पत्नी धन्य आहे धन्य तो पती ज्याला  अशी देवीसारखी पत्नी मिळते.

3/8

चंद्राचा प्रकाश संदेश घेऊन आलाय  तुमची साथ अशीच कायम राहो  करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा 

4/8

अंतःकरणात एकमेकांबद्दल आदर कायम राहो. नेहमी एकमेकांवरचा विश्वास दृढ होवो.

5/8

मेहंदीचा रंग तुमच्या प्रेमाची साक्ष देत राहो. कपाळावर लावलेले सिंदूर कायम फुलत राहावे. नातं गळ्यातील मंगळसूत्रासारखं घट्ट राहो. प्रत्येक करवा चौथच्या दिवशी आमचे प्रेम असेच राहो.

6/8

सात जन्माची साथ अशीच कायम राहू दे. तू असाच कायम माझ्यासोबत असू दे. हीच परमेश्वराला जवळ प्रार्थना. करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा.

7/8

तुमचे जीवनही चंद्राच्या शितलतेमध्ये उजळून निघावे. तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास सदैव टिकून राहो. करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा.

8/8

तुमच्या जीवनात आनंदाचा चंद्र सदैव चमकत राहो. करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम असंच सदैव फुलत राहो...