PHOTO : 11 वर्ष मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न, 4 वर्षांनी घटस्फोट, मग आला परदेशी प्रियकर, लग्न न करता अभिनेत्री झाली आई
Entertainment : भारतीय चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यापैकी अनेकांनी आपल्या सहकलाकारांच्या प्रेमात पडून लग्नही केलं. असे काही आहेत ज्यांचे चित्रपट दिग्दर्शकासोबत नातेसंबंध देखील जुळले. आज आम्ही अशा अभिनेत्रीबद्दल बोलतोय जिने 11 वर्ष मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न केलं खरं पण 4 वर्षांमध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर लग्न न करता तिने बाळाला जन्म दिला.
1/9
2/9
कल्की कोचलिन ही एक फ्रेंच अभिनेत्री आणि लेखिका आहे. पण तिचा जन्म भारतातील पाँडिचेरी इथे झाला. आधुनिक जीवनशैलीसाठी अभिनेत्री प्रसिद्ध आहे. तिने तिच्या कौशल्यांसाठी एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन स्क्रीन पुरस्कार जिंकले आहेत. फ्रेंच नागरिक असूनही, ती भारतातच लहानाची मोठी झाली.
3/9
कल्कीला लहानपणापासूनच थिएटरचे आकर्षण होतं. तिने गोल्ड स्मिथ्स, लंडन विद्यापीठात नाटकाचा अभ्यास केला आणि स्थानिक थिएटर कंपनीमध्येही काम केलं. भारतात परतल्यानंतर, तिने चंदा या ब्लॅक कॉमेडी-ड्रामा Dev.D (2009) मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
4/9
कल्कीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर रोमँटिक कॉमेडी-ड्रामा जिंदगी ना मिलेगी दोबारा (2011) आणि ये जवानी है दिवानी (2013), ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. कल्कीने क्राईम थ्रिलर द गर्ल इन येलो बूट्स (2011) सह स्क्रिप्ट रायटिंगमध्ये तिची कारकीर्द वाढवली, ज्यामध्ये तिने मुख्य भूमिका देखील केली होती.
5/9
मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ (2014) या नाटकामध्ये सेरेब्रल पाल्सी ग्रस्त तरुणीच्या चित्रणासाठी कोल्कला उच्च प्रशंसा आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, विशेष ज्युरी पुरस्कार जिंकलाय. केल्कीने अनेक यशस्वी वेब सिरीजमध्ये काम केलं. अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या मेड इन हेवन या रोमँटिक ड्रामामध्ये एकाकी सोशलाईट आणि Netflix च्या क्राइम थ्रिलर सेक्रेड गेम्स (2019) मधील स्वयंघोषित गॉडवूमनच्या भूमिकेबद्दल तिने प्रशंसा मिळवली.
6/9
7/9
8/9
9/9