दुबईमध्ये बनणार जगातील एकमेव तरंगतं रिसॉर्ट; 5 लाख स्क्वेअरफूट 47 लाखांचं बजेट आणि बरंच काही...

दुबई या शहरात एक अनोखं आणि वेगळंच हवेतील रिसॉर्ट बनणार असल्याची घोषणा केली आहे. या रिसॉर्टबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या. 

Feb 06, 2025, 13:32 PM IST

Therme Resort in Dubai: दुबई या शहरात एक अनोखं आणि वेगळंच हवेतील रिसॉर्ट बनणार असल्याची घोषणा केली आहे. या रिसॉर्टबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या. 

1/8

हवेतील रिसॉर्ट

आपल्या आधुनिक जीवनशैली आणि उंच इमारतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुबई या शहरात एक वेगळंच रिसोर्ट बनणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. (Photo Credit- X/@DXBMediaOffice)  

2/8

'थर्मे दुबई' रिसॉर्ट

नुकतंच, दुबईमध्ये एक आलीशान हवेतील रिसॉर्ट उभं करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दुबईतील जबील पार्क मध्ये 'थर्मे दुबई' नावाचं जगातील सर्वाधिक उंच आणि वेल-बिइंग रिसॉर्ट बांधण्यास सुरुवात होणार आहे. या भव्य रिसॉर्टची उंची 100 मी इतकी असणार आहे.   

3/8

क्राउन प्रिंस यांनी केली घोषणा

दुबईचे क्राउन प्रिंस शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी या हवेतील रिसॉर्टच्या बांधकामाची घोषणा केली आहे. हे रिसॉर्ट 500 हजार स्क्वेअरफूट क्षेत्रात बांधलं जाणार आहे. या रिसॉर्टमध्ये एक इंटरेक्टिव्ह गार्डनसुद्धा असणार आहे.   

4/8

2028 पर्यंत पूर्ण होणार काम

सोशल मिडीयावर या रिसॉर्टचा एक 3D व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. भविष्यातील या रिसॉर्टची झलक या व्हिडीमधून लोकांना पाहता येणार आहे. तसेच, हे रिसॉर्ट 2028 मध्ये खूले होणार असल्याचे सांगितले जात आहे.   

5/8

रिसॉर्टमध्ये असतील वर्ल्ड क्लास आधुनिक सुविधा

जैवविविधता तसेच पर्यावरणीय स्थिरतेचे महत्त्व लक्षात घेऊन तसेच दुबईच्या लोकांना एक वेगळा आणि अनोखा अनुभव घेता यावा, यासाठी हे रिसॉर्ट उभारण्यात येणार असल्याचे क्राउन प्रिंस यांनी सांगितले.  

6/8

कोट्यवधी रुपये होतील खर्च

खलीज टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सरकारने या नवीन लँडमार्कच्या विकासासाठी 47 अब्ज रुपये दिले आहेत. रिसॉर्टमध्ये इंटरएक्टिव्ह पार्क देखील असेल जे जगातील सर्वात मोठे इनडोअर बोटॅनिकल गार्डन असेल. तसेच दरवर्षी भेट देणाऱ्या लाखो पर्यटकांना इथे अनेकविध सेवा पुरवण्यात येतील.    

7/8

रिसॉर्टमध्ये असतील 200 हून अधिक पार्क्स

दुबई हे जगातील सर्वात आधुनिक आणि चांगले शहर बनवणे हेच हे रिसॉर्ट बांधण्यामागचे उद्देश आहे. या योजनेत 200 हून अधिक पार्क्स, समुद्रकिनाऱ्यावर साइक्लिंग ट्रॅकचा विस्तार असे बऱ्याच कल्पनांचा समावेश आहे.   

8/8

3000 हून जास्त झाडे लावण्यात येतील

या रिसॉर्टच्या बांधणीत, प्रत्येक निवासी क्षेत्रात विशिष्ट वास्तू प्रवेशद्वार देखील असतील. तसेच, या रिसॉर्टमध्ये 3 हजारांहून अधिक झाडे आणि रोपे लावण्यात येणार आहेत.