...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! 12 दिवसांपूर्वी स्वर्गासारखं दिसायचं इरशालवाडी; पाहा Photos

Irshawadi Landslide Before And After Photos: रागयगडमधील इरसालगडाच्या पायथ्याशी असलेलं इरसालवाडी गावावर दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने संपूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. या दुर्देवी घटनेनंतर इरसालवाडीचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडीओ समोर आला असून हे फोटो पाहून सोन्यासारख्या या गावाला कोणाची नजर लागली असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पाहूयात या गावाचे काही दिवसांपूर्वीचे फोटो...

| Jul 20, 2023, 13:18 PM IST
1/15

Irshawadi Landslide Before And After Photos

दरड कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं इरसालवाडी गाव फारच सुंदर होतं. याच गावाचे दुर्घटनेआधीचे काही फोटो समोर आले असून ते पाहून नक्कीच तुमचंही मन सुन्न होईल.

2/15

Irshawadi Landslide Before And After Photos

रायगडमधील इरसालवाडीवरील अनेक घरांवर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

3/15

Irshawadi Landslide Before And After Photos

इरसालवाडीमधील या दुर्घटनेमध्ये 10 गावकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेकजग मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

4/15

Irshawadi Landslide Before And After Photos

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री गिरीष महाजन यासारख्या नेत्यांनी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला आहे.

5/15

Irshawadi Landslide Before And After Photos

ज्या इरसालवाडीवर दरड कोसळली त्या इरसालवाडीचा 12 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे.

6/15

Irshawadi Landslide Before And After Photos

इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावाचा ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे.

7/15

Irshawadi Landslide Before And After Photos

गडकिल्ल्यांवर भ्रमंती करुन ड्रोनने ते निसर्ग कॅमेरात टीपणाऱ्या व्हिडिओ ब्लॉगर जीवन कदम यांनी इरसालगडाचा व्हिडिओ 'झी २४ तास'ला उपलब्ध करुन दिला आहे.

8/15

Irshawadi Landslide Before And After Photos

निसर्गाच्या कुशीत वसलेली इरसालवाडी किती नयनरम्य होती, याची कल्पना देणारा हा ड्रोन व्हिडीओ आहे.

9/15

Irshawadi Landslide Before And After Photos

इरसालवाडीच्या पाठीशी असलेला इरसालगडचा डोंगर धुक्यात हरवल्याचं या 8 तारखेच्या व्हिडीओत दिसत आहे.

10/15

Irshawadi Landslide Before And After Photos

इरसालवाडी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं असल्याने खाली दिसणारे जलसाठेही या ड्रोनमध्ये गावाच्या बॅकग्राउण्डला दिसत आहेत.

11/15

Irshawadi Landslide Before And After Photos

इरसालवाडीचा हा व्हिडिओ 8 जुलैचा आहे.

12/15

Irshawadi Landslide Before And After Photos

8 जुलैंच्या या व्हिडीओमध्ये डोंगराच्या उतरणीनंतर असलेली आणि आज मातीत गाडली गेलेली घरं दिसत आहेत.

13/15

Irshawadi Landslide Before And After Photos

डोंगर संपल्यानंतर जिथून सपाट भाग सुरु होतो तिथेच इरसालवाडी वसल्याचं या ड्रोन व्हिडीओमध्ये दिसत आहे.

14/15

Irshawadi Landslide Before And After Photos

इरसालगड हा ट्रेकर्सच्या सर्वात आवडत्या भटकतींच्या ठिकाणांपैकी एक असल्याने या गडावर कायमच ट्रेकर्सची वर्दळ असते. इरसालवाडीतील अनेक घरांमध्ये या ट्रेकर्सचा पाहुणचार व्हायचा.

15/15

Irshawadi Landslide Before And After Photos

अवघ्या 12 दिवसांमध्ये या गावातील परिस्थिती होत्याचं नव्हतं झालं म्हणण्यासारखी झाली आहे.