हार्दिक पंड्याने 10 वर्षात IPL मधून किती पैसा कमावला पाहिलं का?

Hardik Pandya Total Earning In IPL: मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट डेव्हलपमेंट विंगने 2015 च्या लिलावामध्ये अवघ्या 10 लाखांमध्ये हार्दिकला संघात घेतलं होतं. यानंतर तो 2022 साली पहिल्यांदा संघापासून वेगळा झाला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला थेट जेतेपदापर्यंत घेऊन गेला. मात्र आता 2 वर्ष गुजरातचं नेतृत्व केल्यानंतर पंड्या पुन्हा मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. पण हार्दिकने या कालावधीत आयपीएलमधून एकूण किती कमाई केली आहे पाहिलं का?

Swapnil Ghangale | Nov 28, 2023, 11:56 AM IST
1/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा इंडियन प्रिमिअर लिगच्या पुढील पर्वाआधी आपल्या मूळ संघाची वाट पकडली आहे. हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली आहे.

2/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

मुंबई इंडियन्से गुजरात टायटन्सकडून हार्दिक पंड्याला ट्रेड केलं आहे. पाचवेळा इंडियन प्रिमिअर लिगच्या चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिकसाठी 15 कोटी रुपये मोजले असून या व्यतिरिक्त बरीच रक्कम ट्रान्सफर फी म्हणूनही मोजली आहे.

3/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

या ट्रान्सफरसहीत हार्दिक पंड्याला पहिल्यांदा संधी देणाऱ्या मुंबईच्या संघाकडूनच तो खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट डेव्हलपमेंट विंगने 2015 च्या लिलावामध्ये अवघ्या 10 लाखांमध्ये हार्दिकला संघात घेतलं होतं.  

4/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

त्यानंतर हार्दिक पंड्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. हार्दिक पंड्या मजल दरमजल करत प्रगती करत गेला आणि मुंबई इंडियन्सच्या संघाच्या विजयात तो अनेकदा मोलाचा वाटेकरी ठरला. तो संघात असताना संघाने 6 वर्षात 4 वेळा जेतेपदं जिंकलं.

5/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

पहिल्या 2 पर्वांमध्ये हार्दिक पंड्याला विशेष चमक दाखवता आली नाही. मात्र 2017 साली त्याने आयपीएलच्या पर्वात 35.71 च्या सरासरीने 250 धावा केल्या. तसेच त्याने 6 विकेट्ही घेतल्या. त्यामुळे 2018 मध्ये त्याला 11 कोटींची बोली लावून मुंबईने त्याला संघात ठेवलं.

6/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

2018 आणि 2019 चं पर्वही पंड्यासाठी फारच खास राहिलं. त्याने 260 आणि 402 धावा केल्या. त्याने या दोन्ही पर्वामध्ये एकूण 32 विकेट्स घेत आपण अष्टपैलू खेळाडू असल्याचं सिद्ध केलं.

7/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

सलग 3 पर्वांमध्ये पंड्याला मुंबईने रिटेन केल्यानंतर 2021 साली मुंबईने त्याला करारमुक्त केलं. पण पुन्हा मुंबईनेच त्याला 11 कोटींना विकत घेतलं. पण त्याला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. त्याने 12 मॅचमध्ये केवळ 127 धावा केल्या. त्यामुळे त्याला मुंबईने 2022 रोजी पुन्हा करारमुक्त केलं. 

8/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

2022 ला पंड्याचं नशीब पालटलं. नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायन्सनं हार्दिक पंड्यावर विश्वास दाखवला आणि त्याला 15 कोटींना विकत घेत थेट कर्णधार केलं.

9/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

पंड्याने पहिल्याच पर्वात गुजरातला आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं. त्याने 15 मॅचमध्ये 487 धावा केल्या. तसेच त्याने 8 विकेट्सही घेतल्या. पहिल्याच पर्वात चषक जिंकणारा तो दुसराच कर्णधार ठरला.

10/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

हार्दिक पंड्या त्यानंतर गुजरातला 2023 च्या पर्वात अंतिम सामन्यात घेऊन गेला. मात्र तिथे चेन्नकडून त्यांचा पराभव झाला. आता पंड्या 2 वर्षांनी पुन्हा संघात परतला आहे. 28 वर्षीय हार्दिक पंड्या भारतीय टी-20 क्रिकेट संघाप्रमाणे रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्सची धुरा संभाळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

11/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

हार्दिकला 2015 साली आयपीएलसाठी 10 लाख रुपये मिळाले. 2016 आणि 2017 मध्येही त्याला इतकीच रक्कम मिळाली. 2018 मध्ये हार्दिकने थेट 11 कोटींपर्यंत झेप घेतली. त्यानंतर पुढील 3 वर्ष म्हणजेच 2019, 2020, 2021 मध्ये प्रत्येक वर्षाला 11 कोटी रुपये मानधन आयपीएलसाठी मिळालं.

12/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

2022 मध्ये पंड्याला 15 कोटींची विक्रमी रक्कम मिळाली. तो पहिल्यांदाच मुंबई वगळता इतर संघाकडून खेळला. 2023 लाही त्याला 15 कोटी मिळाले. आता 2024 साठी तो 15 कोटी घेऊन मुंबईकडून खेळणार आहे.

13/13

This Is How much has Hardik Pandya earned in IPL over the years

2015 ते 2024 या 10 वर्षांच्या कालावधीत हार्दिकने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 89 कोटी 30 लाख रुपये मानधन घेतलं आहे.