IPL साठी भारतात आल्यानंतर थेट अयोध्येतील राम मंदिरात पोहोचला 'हा' परदेशी खेळाडू; फोटो Viral

IPL 2024 Foreign Player Visits Ram Mandir In Ayodhya: इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या पर्वाची सुरुवात 22 मार्चपासून होत आहे. या स्पर्धेनिमित्त अनेक परदेशी खेळाडू भारतात दाखल झाले आहेत. 10 वेगवेगळ्या संघांकडून हे खेळाडू खेळणार आहेत. मात्र यापैकी एक खेळाडू भारतात दाखल झाल्यानंतर लगेच अयोध्येत जानेवारी महिन्यात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी गेला होता. त्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय.

| Mar 22, 2024, 16:02 PM IST
1/11

IPL 2024 Foreign Player Visits Ram Mandir In Ayodhya

दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज हा कायमच चर्चेत असतो. त्याही केशव महाराज हा हिंदू असून अनेकदा तो हिंदू देवी-देवतांचे फोटो पोस्ट करत असतो.  

2/11

IPL 2024 Foreign Player Visits Ram Mandir In Ayodhya

भारतीय वंशाचा केशव महाराज (Keshav Maharaj) दक्षिण आफ्रिकेच्या अंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातून. उत्तर प्रदेशातील (utter pradesh) सुलतानपूर जिल्ह्यातून केशव महाराजचे पूर्वज 1874 मध्ये भारतातून डर्बन येथे नोकरीच्या शोधात आले होते. त्यानंतर त्यांचे पूर्वज तेथेच स्थायिक झाले.  

3/11

IPL 2024 Foreign Player Visits Ram Mandir In Ayodhya

केशव महाराज (Keshav Maharaj on soical media) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दक्षिण आफ्रिकेत राहूनही तो हिंदू धर्माचं पालन करतो.   

4/11

IPL 2024 Foreign Player Visits Ram Mandir In Ayodhya

केशव महाराजच्या बॅटवरही ओम हे हिंदू धर्मातील पवित्र अक्षर लिहिलेलं आहे.

5/11

IPL 2024 Foreign Player Visits Ram Mandir In Ayodhya

केशव महाराज हा भारतीय फलंदाज विराट कोहलीचा मोठा चाहता आहे.

6/11

IPL 2024 Foreign Player Visits Ram Mandir In Ayodhya

केशव महाराज भगवान हनुमानाचा मोठा भक्त आहे. तो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेकदा हनुमानाचे फोटो पोस्ट करतो.  

7/11

IPL 2024 Foreign Player Visits Ram Mandir In Ayodhya

भारताविरुद्धच्या T20 सामन्यापूर्वी 2023 मध्ये सप्टेंबर महिन्यात केशव महाराजने पद्मनाभ स्वामी मंदिरात भगवान विष्णूच्या दर्शनासाठी गेला होता. अनेक वेळा भारतीय पारंपारिक पोशाख धोतर आणि कुर्तामध्येही दिसला आहे.

8/11

IPL 2024 Foreign Player Visits Ram Mandir In Ayodhya

केशव महाराजने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामचंद्रांचा फोटो पोस्ट केला होता.  

9/11

IPL 2024 Foreign Player Visits Ram Mandir In Ayodhya

आता आयपीएलनिमित्त भारतात आलेल्या केशव महाराजने आल्या आल्या अयोध्येतील राम मंदिरामध्ये जाऊन रामलल्लांचं दर्शन घेतलं. त्याने 'जय श्री राम, प्रभू रामांचे आशिर्वाद सर्वांवर राहोत,' अशी कॅप्शन दिली आहे.

10/11

IPL 2024 Foreign Player Visits Ram Mandir In Ayodhya

अनेकांनी केशव महाराजच्या या फोटोवर कमेंट करुन जय श्रीराम असं म्हटलं आहे. केशव महाराज लखनऊ सुपर जायंट्सच्या संघातून यंदा म्हणजेच आयपीएल 2024 चं पर्व खेळणार आहे.  

11/11

IPL 2024 Foreign Player Visits Ram Mandir In Ayodhya

केशव महाराजची पत्नीही भारतीय संस्कृतीचं पालन करते. एप्रिल 2022 मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले.