IPL 2018: उद्घाटन सोहळ्यात 'या' 6 टीम्सचे कॅप्टन दिसणार नाहीत

Mar 22, 2018, 18:41 PM IST
1/7

आयपीएल २०१८ चा उद्घाटन सोहळा ७ एप्रिल रोजी होणार आहे. ७ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०१८ची पहिली मॅचही त्याच दिवशी खेळली जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन टीममध्ये मॅच होणार आहे. 

2/7

उद्घाटन सोहळ्याच्या दिवशीच मॅचलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे टीम्सच्या कॅप्टनला उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून आपल्या मॅचेस खेळण्यासाठी तात्काळ रात्रीच निघणं कठीण आहे. यामुळे उद्घाटन सोहळ्यात विराट कोहली, स्टीव स्मिथ, गौतम गंभीर, रविचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक आणि डेव्हिड वॉर्नर हे उपस्थित राहणार नाहीयेत.

3/7

दोन टीम्सचे कॅप्टन ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत जे दक्षिण आफ्रिकेत टेस्ट मॅचेस खेळत आहेत. त्यामुळे स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत हे निश्चित आहे.  

4/7

उद्घाटन सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ एप्रिल रोजी मोहालीत किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे पंजाबचा कॅप्टन आर अश्विन हा मुंबईतील उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाही.  

5/7

अशीच अवस्था दिल्लीच्या टीमचा कॅप्टन गौतम गंभीर याची आहे. आर अश्विन प्रमाणेच गौतम गंभीरही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाही.

6/7

तर, ८ एप्रिल रोजी कोलकातामध्ये मॅच असल्याने दिनेश कार्तिक याला उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाहीये.

7/7

टीम इंडियाचा कॅप्टन आणि आरसीबीची टीम लीड करणारा कोहली ८ एप्रिल रोजी कोलकातामध्ये आपली पहिली मॅच खेळणार आहे. त्यामुळे विराटही उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाही.