Indian Railways : 'ही' आहेत सर्वाधिक उंचीवर असणारी जगात भारी रेल्वे स्थानकं; पाहून आताच जायचा बेत आखाल

Indian Railways : यामध्ये पर्वतरागांमध्ये स्थिरावलेली रेल्वे स्थानकं विशेष आकर्षणाचा भाग. ही स्थानकं आणि त्याच्या आजुबाजूला असणारा परिसर इतका सुरेख की फोटो पाहूनही तडक तिथे जाण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही. 

Feb 22, 2023, 15:31 PM IST

Indian Railways : प्रवाशांना सुविधा देण्यासोबतच भारतीय रेल्वे आणखी एका कारणासाठी ओळखली जाते. ते कारण म्हणजे रेल्वे प्रवासादरम्यान दिसणारं नैसर्गिक सौंदर्य. देशाच्या विविध भागांमधून जाणाऱ्या रेल्वेमार्गांवरून तितक्याच विविधरुपी निसर्गाची छटा आजवर अनेकदा प्रवाशांना पाहायला मिळाली आहे. 

1/5

Kangra Valley Railway

Indias highest mountain railway stations names and destinations read details

हिमाचल प्रदेशात येणारं Jogindernagar  हे रेल्वे स्थानक समुद्रसपाटीपासून 1189 मीटर उंचीवर आहे. कांगडा व्हॅली रेल्वे पठाणकोटपासून जोगिंदरनगरपर्यंत धावते. 

2/5

Kangra Valley Railway

Indias highest mountain railway stations names and destinations read details

कांगडा व्हॅली रेल्वेच्या मार्गात येणारं Ahju हे स्थानक समुद्रसपाटीपासून 1210 मीटर इतक्या उंचीवर आहे. 

3/5

Kalka-Shimla Railway

Indias highest mountain railway stations names and destinations read details

काल्का ते शिमला या रेल्वे मार्गात बरीच आकर्षणं आहेत. UNESCO World Heritage Site मध्ये या मार्गाचा समावेश होतो. या रेल्वे मार्गावर असणारं शिमला हे स्थानक समुद्रसपाटीपासून 2086 मीटर उंचीवर आहे. 

4/5

Nilgiri Mountain Railway

Indias highest mountain railway stations names and destinations read details

मेट्टूपालयम किंवा कोईंबतूर ते उटी या मार्गावर धावणारी निलगिली माऊंटन रेल्वेसुद्धा तितकीच कमाल. इथं समुद्र सपाटीपासून 2210 मीट उंचीवर असणारं उटीचं रेल्वे स्थानक अनेकांच्याच आवडीचं. 

5/5

Darjeeling Himalayan Railway

Indias highest mountain railway stations names and destinations read details

जलपायगुडी आणि दार्जिलिंगदरम्यान ही रेल्वे धावते. या मार्गावर येणारं Ghum स्थानक समुद्रसपाटीपासून 2,257 मीटर उंचीवर स्थिरावलं आहे.