दाढी, लघवी, सेक्स आणि स्तन झाकण्यासाठी द्यावे लागायचे पैसे, 'हे' आहेत जगातील सर्वात विचित्र Tax

Strange taxes of the world: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२४-२५ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पात कर अर्थात टॅक्सची जोरदार चर्चा आहे. लोकांना सरकारकडून आयकरासह अनेक प्रकारच्या करांमधून सूट मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान,  आम्ही तुम्हाला जगातील काही आश्चर्यकारक करांबद्दल सांगणार आहोत. कारण काही ठिकाणी दाढी, लघवी, टोपी, मीठ यांसारख्या गोष्टींवर भारी कर वसूल केला जात होता. 

तेजश्री गायकवाड | Feb 01, 2025, 12:51 PM IST

Strange taxes of the world: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२४-२५ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पात कर अर्थात टॅक्सची जोरदार चर्चा आहे. लोकांना सरकारकडून आयकरासह अनेक प्रकारच्या करांमधून सूट मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान,  आम्ही तुम्हाला जगातील काही आश्चर्यकारक करांबद्दल सांगणार आहोत. कारण काही ठिकाणी दाढी, लघवी, टोपी, मीठ यांसारख्या गोष्टींवर भारी कर वसूल केला जात होता. 

1/8

दाढीवरती कर

1535 मध्ये सम्राट हेन्री यांनी दाढीवर कर लादला होता. त्यावेळी इंग्लंडमधील सर्वांना आश्चर्यचकित केले. जरी हा सामान्य माणूस स्थितीवर अवलंबून होता. तरी कर हा भरावाच लागत होता.   

2/8

शेजाऱ्याला भरावा लागला कर

हेन्रीनंतर त्यांच्या मुलीने दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ मोठी दाढी ठेवल्यास कर वसूल केला जातो असा नियम केला. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे कर वसुलीच्या वेळी घरातून कोणी पळून गेले तर शेजाऱ्यांना पैसे द्यावे लागायचे. 

3/8

सेक्सवरही भरावा लागला कर

1971 मध्ये, डेमोक्रॅटिक राज्याचे आमदार बर्नार्ड ग्लॅडस्टोन यांनी सेक्सवर दोन डॉलर्सचा कर प्रस्तावित केला. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. प्रांताची आर्थिक स्थिती बिकट असल्याने हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

4/8

जर्मनी मध्ये वेश्याव्यवसाय कर

याशिवाय जर्मनीत वेश्या म्हणून काम करणाऱ्या महिलांना दरमहा १५० रुपये कर भरावा लागत होता. हे 2004 मध्ये लागू केले गेले, कारण जर्मनीमध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे आणि सरकार त्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा करायचे. (AI PHOTO)

5/8

पेशाबवरती कर

प्राचीन काळी मूत्रावरही कर वसूल केला जात असे. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे कसे होऊ शकते? तर प्रत्यक्षात, लघवीमध्ये अमोनियाच्या असल्यामुळे त्याचा अनेक गोष्टींमध्ये वापरले गेले. याचमुळे रोमच्या राजाने सार्वजनिक मूत्रालयातील मूत्र वितरणावर कर लादण्यास सुरुवात केली.

6/8

महिलांनी कापले होते स्तन

मात्र, एका महिलेकडून कर वसूल केला जात असताना तिने विरोध करत तिचे स्तन कापले. कारण तिला कर भरायचा नव्हता. स्तनविच्छेदन केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर राजाने हा कर हटवला.

7/8

आत्म्यावरही कर लावला गेला

रशियाच्या राजाने आत्म्यावरही कर लावला होता. म्हणजे आत्म्यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना कर भरावा लागला.

8/8

धार्मिक विश्वासावर कर

मात्र, धार्मिक श्रद्धा न पाळणाऱ्यांनाही कर भरावा लागला. हा कर रशियाचा राजा पीटर द ग्रेट याने १७१८ मध्ये लागू केला होता.