Railway Rules:ट्रेन तिकीट बुकींगचा 'हा' नियम तुम्हाला माहिती असायला हवा!

Nov 16, 2024, 20:14 PM IST
1/10

Railway Rules:ट्रेन तिकीट बुकींगचा 'हा' नियम तुम्हाला माहिती असायला हवा!

Indian Railway Rules Confirm Train PNR and Wating  Ticket Booking

Indian Railway Ticket Booking Rules: रेल्वे प्रवाशांना एका नव्या नियमाची माहिती असणे आवश्यक आहे. देशातील लाखो प्रवासी दररोज ट्रेनने प्रवास करतात. कुटुंब किंवा मित्रांसह प्रवास करताना एकाच पीएनआर क्रमांकावर अनेक तिकिटे बुक केली जातात.यातील तर काही तिकिटे कन्फर्म होतात तर काही प्रतीक्षा यादीत राहतात. 

2/10

रेल्वेचे नियम

Indian Railway Rules Confirm Train PNR and Wating  Ticket Booking

ज्यांची तिकिटे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना ट्रेनमध्ये प्रवास करता येणार की नाही? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय. याबाबत रेल्वेचे नियम काय म्हणतात? ते जाणून घेऊया.

3/10

पीएनआर आणि वेटिंग तिकिटाचा अर्थ काय?

Indian Railway Rules Confirm Train PNR and Wating  Ticket Booking

PNR म्हणजेच पॅसेंजर नेम रेकॉर्ड हा एक कोड असतो. जो ट्रेनच्या प्रवासाच्या माहितीबाबत रेल्वे आरक्षण प्रणालीमध्ये सेव्ह केला जातो. जेव्हा तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करता तेव्हा एक PNR नंबर तयार होतो. या पीएनआर नंबरवर एकापेक्षा जास्त प्रवासी असू शकतात. प्रत्येक प्रवाशाचे तिकीट कन्फर्म किंवा वेटिंगलिस्ट केलेले तिकीट असू शकते. काही प्रवासी कन्फर्म झाले तर काहींची तिकिटे वेटिंग लिस्टमध्ये असतील तर काय होईल?

4/10

रेल्वेचा नियम काय सांगतो?

Indian Railway Rules Confirm Train PNR and Wating  Ticket Booking

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार एकाच पीएनआर क्रमांकावर 6 प्रवाशांची तिकिटे बुक करता येतात. त्या 6 प्रवाशांपैकी काही प्रवाशांची तिकिटे कन्फर्म झाली तर प्रतीक्षा यादीत असलेले उर्वरित प्रवासीही प्रवास करू शकतील.

5/10

उर्वरित प्रवासी देखील प्रवास करू शकतात

Indian Railway Rules Confirm Train PNR and Wating  Ticket Booking

PNR क्रमांकावर एक तिकीटही कन्फर्म झाले आणि त्यातील इतरांचे तिकिट वेटींगवर असेल तर उर्वरित प्रवासी देखील प्रवास करू शकतात. असे असले तरी त्यांना जागा मिळेलच याची शाश्वती नसते.

6/10

प्रवास करण्याची परवानगी

Indian Railway Rules Confirm Train PNR and Wating  Ticket Booking

PNR क्रमांकावरील काही तिकिटे कन्फर्म झाल्यास, काही आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) आणि काही प्रतीक्षा यादीत असल्यास, सर्व प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी आहे. 

7/10

उपलब्धतेनुसार जागा

Indian Railway Rules Confirm Train PNR and Wating  Ticket Booking

प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना केवळ उपलब्धतेनुसार जागा मिळू शकतात. अन्यथा त्या प्रवाशाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय या प्रवाशांना पैसे रिटर्नही मिळत नाहीत. ते प्रवास करत असल्याने पैसे रिटर्न दिले जात नाहीत.

8/10

कन्फर्म तिकीटाशिवाय प्रवास करू शकाल?

Indian Railway Rules Confirm Train PNR and Wating  Ticket Booking

काही प्रवाशांची तिकिटे पीएनआर क्रमांकावर कन्फर्म झाली, तर उर्वरित प्रवासी ज्यांची तिकिटे प्रतीक्षा यादीत आहेत ते देखील प्रवास करू शकतात. तथापि, त्यांची जागा निश्चित होणार नाही आणि ते उभे राहू शकतात.

9/10

प्रवास करण्याची संधी

Indian Railway Rules Confirm Train PNR and Wating  Ticket Booking

सर्व तिकिटे प्रतीक्षा यादीत असल्यास संपूर्ण पीएनआर रद्द केला जाईल आणि प्रवाशांना परतावा मिळेल. अशाप्रकारे प्रवाशांचे तिकीट कन्फर्म नसले तरी त्यांना प्रवास करण्याची संधी रेल्वे यंत्रणा देते.

10/10

असा प्रवास न करणे चांगले

Indian Railway Rules Confirm Train PNR and Wating  Ticket Booking

म्हणजेच त्याच PNR वरील काही तिकिटांची पुष्टी झाल्यास प्रतीक्षा यादीत असलेले प्रवास करू शकतात परंतु त्यांना सीटची हमी नाही किंवा त्यांना परतावाही मिळणार नाही. अशा परिस्थितीत गैरसोय टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याशिवाय असा प्रवास न करणे चांगले मानले जाते.