भारतात ₹ 2,100,000 चं तिकीट काढत लोक अशा कोणत्या रेल्वेनं प्रवास करतात? पाहा अस्सल सोन्या-चांदीनं मढलीये ही ट्रेन

रेल्वे रुळांवर धावणारा हा खराखुरा, चकाकणारा शीशमहाल जणू... 

Sayali Patil | Feb 13, 2025, 16:23 PM IST

सर्व श्रेणीतील प्रवाशांच्या गरजा ओळखत भारतात रेल्वे विभागाकडून कायमच नवनवीन संकल्पनांना आकार दिला जातो. ही ट्रेनही याचच एक उदाहरण.

 

1/7

रेल्वे

indian railway Most Expensive Train in India Maharajas Express ticket price

Indian Railway : भारतात सर्वाधिक वाहतूक, प्रवास हा रेल्वे मार्गानं होत असल्यामुळं देशात दर दिवशी हजारोंच्या संख्येनं ट्रेन धावतात. एका टोकाहून दुसऱ्या टोकाचा जोडत देशाला खऱ्या अर्थानं जवळ आणणारा हा रेल्वे प्रवास अविरत सुरूच असतो. अशा या भारतीय रेल्वेनं प्रत्येक प्रवाशाच्या गरजा केंद्रस्थानी ठेवत त्यानुसारच रेल्वेसुविधा पुरवल्या आहेत. जिथं सामान्यांसाठीच्या रेल्वेगाड्यांसमवेत राजेशाही थाटात देश फिरवणाऱ्या आलिशान रेल्वेगाड्यांचा अर्थात महाराजा एक्सप्रेसचाही समावेश आहे. (Maharaja Express)  

2/7

अवघे 88 प्रवासी

indian railway Most Expensive Train in India Maharajas Express ticket price

भारतातील महागड्या रेल्वे गाड्यांपैकीच ही ट्रेनही एक असून, तिच्या एका तिकीटाचा दर हजारोंमध्ये नाही, तर लाखोंमध्ये आहे. या ट्रेननं प्रवास करताना आपण खरेखुरे राजेमहाराजे असल्याचीच जाणीव होते. 2010 मध्ये या रेल्वेची सुरुवात झाली होती. 23 डब्यांच्या या ट्रेनमध्ये अवघे 88 प्रवासी एका वेळी प्रवास करु शकतात. 

3/7

राजमहाल

indian railway Most Expensive Train in India Maharajas Express ticket price

ही ट्रेन राजमहालासारखी सजवण्यात आली असून, त्यामध्ये आलिशान खुर्च्या, पलंग इथपासून खाण्यापिण्याच्याही अशाच सुविधा पुरवल्या जातात. या ट्रेनमध्ये ऑनबार्ड रेस्तराँ, डीलक्स केबिन, जूनियर सूइट, लाऊंज बार अशा सुविधा असून, टीव्ही, इंटरनॅशनल कॉलिंगच्याही सुविधा देण्यात आल्या आहेत. 

4/7

सुविधा

indian railway Most Expensive Train in India Maharajas Express ticket price

मोर महल आणि रंग महल अशा नावाची दोन रेस्तराँ या ट्रेनमध्ये आहेत. जिथं भारतीय, परदेशी आणि कॉन्टीनेन्टल पदार्थांचा आस्वाद प्रवासी घेऊ शकतात. आश्चर्याची बाब म्हणजे इथं जेवण 24 कॅरेट सोन्याचा मुलामा असणाऱ्या ताटांमध्ये वाढलं जातं. 

5/7

पंचतारांकित हॉटेल

indian railway Most Expensive Train in India Maharajas Express ticket price

पंचतारांकित हॉटेलमध्ये आढळणारी प्रत्येक सुविधा या ट्रेनमध्ये पाहायला मिळते. पदरेशी प्रवाशांकडून या ट्रेनला बऱ्याचदा पसंती मिळताना दिसते. ही ट्रेन आठ दिवसात ताजमहाल, खजुराहो मंदिर, रणथंभोर, वाराणासी अशा ठिकाणांवर फिरवते.   

6/7

प्रवासमार्ग

indian railway Most Expensive Train in India Maharajas Express ticket price

चार विविध भागांमध्ये ही ट्रेन प्रवाशांना अविस्मरणीय अनुभव देताना दिसते. जिचं संचलन आयआरसीटीसीकडून केलं जातं. या ट्रेनच्या प्रवासात तिकीट दर सुईटनुसार बदलतं. दिल्ली-आगरा-रणथंबोर-जयपुर दिल्ली मार्गासाठी 4,13,210 प्रति तिकीट इतकी किंमत भरावी लागते. इथं प्रेसिडेंशिअल सुईटसाठी  11,44,980 रुपये इतकं भाडं आकारतात.   

7/7

तिकीट दर

indian railway Most Expensive Train in India Maharajas Express ticket price

दिल्ली-जयपुर-रणथंबोर-फतेहपुर सिकरी-आगरा-खजुराहो-वाराणसी-दिल्ली या मार्गावरील ट्रेनमध्ये डिलक्स केबिनसाठी  6,54,880 रुपये आणि प्रेसिडेंशिअल सुईटसाठी तब्बल 21,03,210 रुपये प्रति तिकीट इतका दर आकारला जातो. अनेकांसाठीच हा स्वप्नवच प्रवास असला तरीही अनेक धनाढ्य मंडळी आणि परदेशी प्रवासी या ट्रेननं प्रवास करण्याला पसंती देतात.