बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, दिग्दर्शकांचं करिअरच संपलं; अख्खी चित्रपटसृष्टी कर्जात बुडाली

भारतातील सर्वात महागडा चित्रपट म्हणून नोंद झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 80 टक्के नुकसान सहन करावं लागलं.   

| Nov 08, 2024, 21:43 PM IST

भारतातील सर्वात महागडा चित्रपट म्हणून नोंद झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 80 टक्के नुकसान सहन करावं लागलं. 

 

1/12

1970, 80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे बदल होत होते. अमिताभ बच्चन यांच्या 'अँग्री यंग मॅन' इमेजमुळे चित्रपट मोठे झाले होते. याशिवाय सोशल आणि पीरियड ड्रामाही प्रेक्षकांच्या वाट्याला येऊ लागले होते.  

2/12

शोले चित्रपटानंतर दिग्दर्शक कमल अमरोही यांनी एक पीरिअड ड्रामा करण्याचा प्रयत्न केला. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मुघल-ए-आझम प्रमाणे हा चित्रपट मोठा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या चित्रपटासाठी 7 वर्षं लागली. मात्र त्याचा शेवट इतका वाईट होता की अख्खी चित्रपटसृष्टी कर्जात बुडाली होती.   

3/12

भारतातील एकमेव महिला मुस्लिम शासक रझिया सुल्तानच्या आयुष्यावर आधारित बायोपिक 1983 मध्ये रिलीज झाला. 10 कोटींमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला होता. त्यावेळचा हा सर्वात महागडा चित्रपट होता.   

4/12

हेमा मालिनी यांच्यासह धर्मेंद्र, परवीन बाबी, सोहराब मोदी आणि अजित अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटात होता. हा चित्रपट हिट होईल अशी शक्यता होती, पण वाईट प्रकारे आपटला.   

5/12

प्रेक्षकांना चित्रपटात वापरलेली उर्दू खूप गुंतागुंतीची वाटली, तर काहींनी चित्रपट मोठा असल्याची टीका केली. धर्मेंद्र यांनी ॲबिसिनियन गुलाम योद्धा याकूतची भूमिका साकारली होती. पण त्यांच्या चेहऱ्याला दिलेल्या काळ्या रंगावरुनही टीका झाली.   

6/12

10 कोटीत तयार झालेल्या रझिया सुल्तान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 2 कोटी कमावले.   

7/12

रझिया सुलतानमध्ये तिची सहाय्यक खाकुन (परवीन बाबीने साकारलेली) सोबतच्या तिच्या जवळीकीचा एक वादग्रस्त ट्रॅक देखील सादर केला. यासाठी एक प्रेमगीत शूट कऱण्यात आलं. तसंच एक किसही दाखवण्यात आला. पण हे समलिंगी चुंबन प्रेक्षकांना आवडलं नाही, ज्यामुळे चित्रपटाला नकारात्मक प्रसिद्धी मिळाी. कौटुंबिक प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि चित्रपटातील मुस्लिम महिलांच्या 'अयोग्य' चित्रणावर मुस्लिम धर्मगुरूंकडून काही आक्षेप घेण्यात आले.  

8/12

रझिया सुलतान चित्रपटापेक्षा जास्त होता. हा एक असा प्रोजेक्ट होता ज्याला बनवायला कित्येक वर्षे लागली आणि ज्याचा खर्च शोलेपेक्षा 60 टक्के जास्त होता. चित्रपटाने शेकडो तंत्रज्ञ आणि हजारो कलाकारांना एक्स्ट्रा म्हणून काम दिलं. अमरोहीने इंडस्ट्रीमधून अनेक कर्ज घेतली होती आणि चित्रपट बनवण्यासाठी अनेक क्रू मेंबर्सचे वेतन देखील रोखले होते. रिलीजनंतर पैसे देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.   

9/12

पण रिलीजनंतर चित्रपट फ्लॉप झाला आणि 80 टक्के नुकसान सहन करावं लागलं. परिणामी बॉलिवूडमधील अनेक उद्योगांना रोख रकमेचा तुटवडा जाणवला.   

10/12

अमरोहीने बहुतांश क्रू मेंबर्सला स्वतःच्या खिशातून पैसे दिले, पण तरीही वितरक आणि प्रदर्शकांना त्रास सहन करावा लागला. IMDb नुसार, जवळजवळ संपूर्ण हिंदी चित्रपट उद्योग काही काळ कर्जात बुडाला होता.  

11/12

पण बॉलिवूड जसं सावरलं तसं कमाल अमरोही यांना जमलं नाही. त्यांनी राजेश खन्नासोबत 'मजनून' नावाचा चित्रपट सुरू केला. पण रझियाला झालेल्या आर्थिक झटक्याने तो चित्रपट रखडला होता.   

12/12

त्यांनी मुघल शासक बहादूरशाह जफर यांच्यावर एक स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली, ज्याला ते आखरी मुघल म्हणत. मात्र, तो कधीच पूर्ण करू झाला नाही. 1993 मध्ये त्यांच्या निधनाने हा चित्रपट संपुष्टात आला आणि 'रझिया सुलतान' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.