देशाच्या सरन्यायाधीशांना IAS अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पगार; सर्वाधिक पगार देणाऱ्या टॉप 10 सरकारी नोकऱ्या!

  सरकारी नोकऱ्यांसाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागले.  खूप मेहनत घ्यावी लागते.

Nov 08, 2024, 21:12 PM IST

Government Job:  सरकारी नोकऱ्यांसाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागले.  खूप मेहनत घ्यावी लागते.

1/13

देशाच्या सरन्यायाधीशांना IAS अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पगार; सर्वाधिक पगार देणाऱ्या टॉप 10 सरकारी नोकऱ्या!

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

Government Job: सध्या खासगी क्षेत्रातील नोकरी टिकण्याबद्दल अनेकांना विश्वास नाही. त्यामुळे चांगला पगार आणि सुरक्षित नोकरीसाठी तरुण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. पण सरकारी नोकऱ्यांसाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागले.  खूप मेहनत घ्यावी लागते. 

2/13

सरकारी संस्थांमधील डॉक्टर

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना चांगला पगार मिळतो. ज्युनिअर रेसिडंट्सना मिळणारा सुरुवातीता पगार हा 52 हजार ते 53 हजारपर्यंत असतो. यानंतर त्यांच्या अनुभव आणि कौशल्यानुसार तो वाढत जातो.

3/13

भारतीय परराष्ट्र सेवा

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

यूपीएससी परीक्षेतून आयएफएस अधिकारी,अवर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड होते. त्यांना मिळणारा पगार लाखाच्या घरात असतो. आकर्षक पगारासह विविध पेस्केल, विशेष विदेशी भत्ते दिले जातात.

4/13

PSUs सॅलकी स्ट्रक्चर

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

PSUs द्वारे उच्च पगाराच्या सरकारी नोकऱ्या ऑफर केल्या जातात.  ज्यात इंजिनीअर्सना E2 ग्रेडनुसार पगार मिळतो. 50 हजार ते 1 लाख 60 हजार आणि इतर भत्ते असा पगार त्यांना दिला जातो. 

5/13

सहाय्यक प्राध्यापक

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

सहाय्यक प्राध्यापक पद हे प्रतिष्ठित आणि चांगल्या पगाराचे म्हणून ओळखले जाते. यांना मॅट्रिक्स लेव्हल-10 नुसार पगार मिळतो. जो 57 हजार 700 रुपयांपासून सुरु होतो. ते 1 लाख 82 हजार 400 रुपये आणि इतर भत्ते असा मिळतो.

6/13

SSC CGL नोकरी

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

वेगवेगळी सरकारी पदे भरण्यासाठी एसएससी सीजीएल परीक्षा घेतली जाते. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार 500 ते 1 लाख 51 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जातो. 

7/13

भारतीय वन सेवा

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

भारतीय वन सेवामध्ये रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना सुरुवातीचा पगार 56 हजार 100, रु. पर्यंत असतो. तो वाढत जाऊन पुढे  2 लाख 25 हजारपर्यंत जातो. यासोबतच्या त्यांना विविध लाभ आणि भत्तेदेखील दिले जातात.

8/13

इस्रो, डीआरडीओ शास्त्रज्ञ/इंजिनीअर

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

इस्रो आणि डीआरडीओ मधील इंजिनीअरिंग पदे सोशल रिसर्च ऑफिसर - C ला  L-10 पे स्केलनुसार दरमहा 56 हजार 100  ते 1 लाख 77 हजार 500 इतका पगार मिळतो. 

9/13

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 56 हजार 100 इतका पगार मिळतो. त्यांना विविध भत्तेदेखील दिले जातात. 

10/13

RBI मधील ग्रेड B अधिकारी

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून ग्रेड B अधिकाऱ्यांची भरती केली जाते. या पदावर निवड झालेल्यांना दरमहा बेसिक पगार 55 हजार 200 रुपये मिळतो. त्यामुळे संपूर्ण वेतनासह हा आकडा दरमहा 1 लाख 08 हजार 404 इतका जातो. 

11/13

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

आयएएस हे देशातील सर्वात प्रतिष्ठित सरकारी पद मानले जाते, IAS अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला यूपीएससी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला दरमहा 56 हजार 100 रुपये इतका पगार मिळतो. त्यानंतर साधारण 8 वर्षांमध्या हा पगार 1 लाख 31 हजार 249 रुपयांपर्यंत वाढू शकतो. योबतच आयएएस अधिकाऱ्याला सरकारी निवास, वाहतूक अशा अनेक सुविधा मिळतात.

12/13

CJI ला किती पगार मिळतो?

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. ते 11 नोव्हेंबरला CJI म्हणून शपथ घेतील. सरन्यायाधीश होताच त्यांच्या पगारात 30 हजार रुपयांची वाढ होणार आहे. न्याय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दरमहा 2.50 लाख रुपये वेतन दिले जाते. परंतु जेव्हा त्यांना CJI बनवले जाते तेव्हा त्यांचे वेतन 2.80 लाख रुपये होते. त्यामुळे CJI झाल्यानंतर, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे वेतन 2.80 हजार रुपये होईल.

13/13

सरन्यायाधीशांना कोणत्या सुविधा मिळतात?

Top 10 Highest Paying Government Jobs Chief Justice of the get more salary than IAS officers

देशाच्या सरन्यायाधीशांना दरमहा 2.80 लाख रुपयांच्या पगाराव्यतिरिक्त इतरही अनेक सुविधा मिळतात. CJI यांना 45 हजार रुपये आदरातिथ्य भत्ता दिला जातो. यासोबतच त्यांना एकरकमी 10 लाख रुपये फर्निशिंग भत्ता मिळतो. देशाच्या CJI ला टाइप 7 बंगला आणि 24*7 सुरक्षा मिळते. यासोबतच एक नोकर, मदतनीस, ड्रायव्हर आणि लिपिकही उपलब्ध करुन दिला जातो. सरन्यायाधीश त्यांच्या ड्युटी दरम्यान कुठेतरी प्रवास करत असतील तर त्यांना त्यांचा खर्चही दिला जातो. यासोबतच त्यांना त्यांच्या वाहनासाठी दर महिन्याला 200 लिटर इंधनही दिले जाते.