Independence Day Offers: iPhone वर 20 हजारांचा डिस्काउंट, आणखी कुठे काय ऑफर्स, एका क्लिकवर सर्व जाणून घ्या
स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमच्या आवडीच्या प्रोडक्टवर बंपर सूट मिळणार आहे. कोणते आहेत हे प्रोडक्ट? जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Aug 15, 2024, 12:41 PM IST
Independence Day Offers: स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमच्या आवडीच्या प्रोडक्टवर बंपर सूट मिळणार आहे. कोणते आहेत हे प्रोडक्ट? जाणून घेऊया.
1/8
Independence Day Offers: iPhone वर 20 हजारांचा डिस्काउंट, आणखी कुठे काय ऑफर्स, एका क्लिकवर सर्व जाणून घ्या

2/8
Vodafone Idea ची ऑफर

वोडाफोना आयडीयाने आपल्या ग्राहकांना स्वातंत्र्यदिनाचे गिफ्ट दिले आहे. व्हीआयने आपल्या यूजर्ससाठी काही प्लान्स आणले असून याचा फायदा 13 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2024 पर्यंत घेता येणार आहे. कंपनीने ऑफर्स अंतर्गत 4 प्लान्स आणले आहेत. ज्यामध्ये रु. 1749, रु 3499, रु 3624 आणि रु 3699 च्या दीर्घकालीन प्लान्सचा समावेश आहे.
3/8
फ्लिपकार्टवर जॅकपॉट डेज डील

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर जॅकपॉट डेज डील सुरू झाली आहे. हा सेल 15 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या कालावधीत सॅमसंग, मोटोरोला आणि पोकोचे स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या जॅकपॉट डेज डीलमध्ये प्रमोशनल आणि बँक डिस्काउंट मिळतंय. यासोबतच फोनवर एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहेत. 24 हजार 999 रुपये किंमतीचा Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून स्वस्तात मिळतोय. सॅमसंगचे मध्यम श्रेणीचे स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करता येतील. Poco M6 Plus 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये सवलतीच्या दरात मिळतोय.
4/8
एलजी इलेक्ट्रॉनिक्सवर ऑफर

एलजी इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांना आपल्या उत्पादनांवर 26 टक्के कॅशबॅक किंवा 40,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे. LG च्या नाविन्यपूर्ण आणि उच्च-गुणवत्तेच्या ऑफरमुळे तुम्हाला तुमचे घर अपग्रेड करता येणार आहे. ग्राहक 15 रुपयांपेक्षा कमी डाउन पेमेंटसह एलजीचे उत्पादन खरेदी करू शकतात. उर्वरित रक्कम सोयीस्कररित्या EMI मध्ये भरण्याची मुभा मिळणार आहे. एलजीच्या निवडक मॉडेल्सवर 888 रुपयांचा निश्चित EMI पर्याय मिळेल.
5/8
टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंटची ऑफर

रतन टाटा यांची रिअल इस्टेट कंपनी टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑफर्स आणली आहे. घरांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांच्या काही प्रोजेक्टवर विशेष ऑफर जाहीर केल्या आहेत. यामध्ये ग्राहकांना कमी मुद्रांक शुल्क आणि मोफत भेटवस्तू मिळवण्याची संधी आहे. या ऑफर प्रामुख्याने भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागात असलेल्या प्रतिष्ठित लक्झरी प्रोजक्टसाठी उपलब्ध आहेत.
6/8
निसानची फ्रीडम ऑफर

निसानने एक विशेष स्वातंत्र्य ऑफर सुरू केली आहे, जी देशभरातील सर्व संरक्षण कर्मचारी आणि केंद्र/राज्य पोलीस, केंद्रीय निमलष्करी दल आणि राज्य पोलीस दलांना मॅग्नाइट मॉडेलवर सूट देत आहे.ही सवलत CSD द्वारे मिळू शकते. यामुळे गाडीचे वास्तविक मुल्य मर्यादित राहून लोकांना त्यावर चांगली रक्कम वाचवता येणार आहे.
7/8
स्टार एअरची ऑफर

स्वातंत्र्य दिनानिमित्त स्टार एअरने आपल्या प्रवाशांसाठी खास ऑफर आणलीय. याअंतर्गत, प्रवाशांना फक्त5 हजार 555 रुपयांमध्ये आरामदायी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करता येईल. यानिमित्ताने तुम्हाला आरामदायी सीट, उत्कृष्ट भोजन आणि वैयक्तिक सेवेचा लाभ घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणाऱ्यांसाठीदेखील ऑफर आहे. तुम्ही फक्त 1,999 रुपयांमध्ये इकॉनॉमी क्लासचा लाभ घेऊ शकता. विशेष बाब म्हणजे या सेल अंतर्गत बुकिंग केल्याने तुम्हाला इकॉनॉमीमध्ये अधिक लेग रूमदेखील मिळेल.
8/8
बिझनेस क्लासमध्ये फक्त 5,555 रुपयांमध्ये प्रवास
