World Test Championship च्या Points Table मध्ये भारताची दमदार Entry; पाहा पॉइण्ट्स टेबल

World Test Championship 2023-25 Points Table: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2023-25 च्या पर्वसाठी खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये यजमान संघाविरुद्ध एका डावाने विजय मिळवत भारताने WTC 2023-25 च्या पॉइण्ट्स टेबलमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. एकीकडे अॅशेज सुरु असतानाच दुसरीकडे भारताने केलेलीय कामगिरीमुळे पॉइण्ट्स टेबलमध्ये नक्की काय घडलंय पाहूयात...

| Jul 15, 2023, 08:58 AM IST
1/10

World Test Championship 2023 25 Points Table

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये दमदार प्रवेश केला आहे. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाअंतर्गत खेळताना वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला.  

2/10

World Test Championship 2023 25 Points Table

भारताने यजमान संघाला 3 दिवसांमध्ये पराभूत केलं. पहिल्या डावामध्ये 150 धावांपर्यंत मजल मारणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाचा दुसरा डावही 130 धावांवर आटोपला. भारताने आपला पहिला डाव 5 विकेट्सवर 421 धावा असताना घोषित केला होता. या वियजासहीत भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वातील पॉइण्ट टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

3/10

World Test Championship 2023 25 Points Table

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकल्याचा फायदा झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2023-25 च्या पर्वातील पॉइण्ट टेबलमध्ये भारताने मोठी उडी घेतली आहे.

4/10

World Test Championship 2023 25 Points Table

टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयासहीत या पॉइण्ट्स टेबलमध्ये विजयाची सरासरी 100 टक्के झाली आहे. 12 अंकांसहीत भारत पहिल्या स्थानावर आहे.

5/10

World Test Championship 2023 25 Points Table

भारताच्या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइण्टस टेबलमध्ये विद्यमान विजेता संघ म्हणजेच ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानी सरकला आहे. ऑस्ट्रेलियान इंग्लंडविरुद्धच्या अॅशेज सिरीजमध्ये पहिले 2 सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाला दमदार सुरुवात केली.

6/10

World Test Championship 2023 25 Points Table

अॅशेजच्या तिसऱ्या कसोटीमध्ये इंग्लडने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाची पॉइण्ट्स टेबलमध्ये घसरण झाली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या या पराभवाचा फायदा भारताला झाला आहे. भारतीय संघाने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

7/10

World Test Championship 2023 25 Points Table

ऑस्ट्रेलियाची 3 कसोटी सामन्यानंतरची विजयाची सरासरी 61.11 टक्के आहे. त्यांचे एकूण 22 गुण आहेत. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. अॅशेजमधील स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला प्रत्येकी 2 गुणांचा फटका बसला असून भारताला याचाही फायदाच झाला आहे.

8/10

World Test Championship 2023 25 Points Table

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा संघ आहे. 3 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडची विजयाची सरासरी 27.78 टक्के इतकी आहे. अॅशेजमधील पहिले दोन सामने गमावल्याने इंग्लंडला मोठा फटका बसला आहे.

9/10

World Test Championship 2023 25 Points Table

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सध्या असे 4 संघ आहेत ज्यांनी किमान एक कसोटी सामना खेळला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या संघांचा यात समावेश आहे.

10/10

World Test Championship 2023 25 Points Table

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 चा पॉइण्ट्स टेबल असा दिसतोय.