भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टेस्ट मॅच पुण्यात, कुठे आणि कशी बुक कराल तिकिटं?

IND VS NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यातील बंगळुरूमध्ये झालेला पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला असून त्यांनी मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली आहे. उर्वरित दोन्ही सामने हे महाराष्ट्रात होणार असून दुसरा टेस्ट सामना हा पुण्यात खेळवला जाणार आहे. 

| Oct 20, 2024, 18:46 PM IST
1/6

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टेस्ट सामना बंगळुरूमध्ये पार पडला. यात टीम इंडियाने विजयासाठी न्यूझीलंडला 107 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान न्यूझीलंडने 8 विकेट्स राखून पूर्ण केले आणि त्यांनी मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली. आता टीम इंडियाला सीरिज विजयासाठी दोन सामने जिंकायचे आहेत.   

2/6

भारत - न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टेस्ट सामना हा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे.   

3/6

पुण्यातील क्रिकेट प्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट असून त्यांना टीव्ही किंवा मोबाईलवर नाही तर आता थेट स्टेडियमवर जाऊन हा रोमांचक टेस्ट सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.   

4/6

24 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामान्याची तिकिटं ही PayTm Insider किंवा Insider. in वर जाऊन बुक करू शकता.    

5/6

भारत - न्यूझीलंड दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या तिकिटांची किंमत ही 499 ते 5000 रुपयांपर्यंत आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमची कॅपॅसिटी 42,700 प्रेक्षक इतकी आहे. 

6/6

WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित 7 टेस्ट सामन्यांपैकी 4 सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे भारताला न्यूझीलंड विरुद्ध उर्वरित दोन्ही टेस्ट सामने जिंकणं गरजेचं आहे. न्यूझीलंड विरुद्ध पहिला सामना गमावल्यामुळे टीम WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी 74.24 वरून थेट 68.06 टक्क्यांवर आली आहे.