अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांची किती संपत्ती? वाचा सविस्तर

Anant Ambani wedding: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचे आज लग्न आहे. अनंत आणि राधिका मर्चंट आज विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नासाठी जगभरातून खास पाहुणे येत आहेत. लग्नानंतर राधिका मर्चंट अंबानी कुटुंबाची सून होणार आहे. लग्नानंतर राधिका मर्चंट किती श्रीमंत होणार जाणून घ्या सविस्तर 

Jul 12, 2024, 16:41 PM IST
1/7

अनंत-राधिका विवाहबंधनात अडकणार

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचे आज लग्न आहे. या लग्न सोहळ्यासाठी जगभरातून पाहुणे मुंबईत दाखल झालेत. अनंत-राधिका मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सात फेऱ्या घेणार आहेत. 

2/7

अनंत-राधिकाच्या लग्नाचा खर्च किती?

अनंत आणि राधिकाचे लग्न जगातील सर्वात महागडे लग्न ठरणार आहे. मुकेश अंबानी मुलाच्या लग्नासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अनंत आणि राधिकाच्या लग्नाचा खर्च जवळपास 4000 ते 5000 कोटींमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीच्या तुलनेत ही रक्कम काहीच नाही.

3/7

अंबानी 123 अब्ज डॉलर्सचे मालक

जगातील अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी 123 अब्ज डॉलर्सचे मालक आहेत. मुकेश अंबानी हे मुलाच्या लग्नात त्यांच्या एकूण संपत्तीपैकी फक्त 0.5 टक्के रक्कम खर्च करत आहेत. 

4/7

अनंत अंबानी किती श्रीमंत आहेत

अनंत अंबानी त्यांच्या वडिलांच्या व्यवसायातील ऊर्जा प्रकल्पांची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यासोबतच त्यांच्याकडे रिलायन्स एनर्जीची जबाबदारी आहे. याशिवाय रिलायन्स फाऊंडेशन, रिलायन्स जिओ, रिलायन्स रिटेलच्या बोर्डातही त्यांचा समावेश आहे. अहवालानुसार त्यांची संपत्ती 40 अब्ज डॉलर्स म्हणजेच 3.3 लाख कोटी रुपये आहे. 

5/7

राधिका मर्चंटकडे किती मालमत्ता?

राधिका मर्चंट ही एन्क्योर हेल्थकेअर या फार्मास्युटिकल कंपनीचे मालक वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंट ही तिच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करते. ते एन्क्युअरच्या बोर्डावर संचालक पदावर आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिकाची संपत्ती जवळपास 10 कोटी रुपये आहे. 

6/7

राधिका मर्चंटकडे किती मालमत्ता?

राधिका मर्चंट ही एन्क्योर हेल्थकेअर या फार्मास्युटिकल कंपनीचे मालक वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंट ही तिच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करते. ते एन्क्युअरच्या बोर्डावर संचालक पदावर आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिकाची संपत्ती जवळपास 10 कोटी रुपये आहे. 

7/7

लग्नानंतर राधिका होणार अंबानी कुटुंबाची सून

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे आज विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नानंतर राधिका अंबानी कुटुंबाची सून होणार आहे. अंबानी कुटुंबाच्या संपत्तीच्या वारसांमध्ये ती सामील होणार आहे.