Lionel Messi: लिओनेल मेस्सीने रचला इतिहास; आठव्यांदा जिंकला Ballon D’or अवॉर्ड

Lionel Messi: अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आठव्यांदा बोलन डी'ओर पुरस्कार जिंकलाय. बोलन डी'ओर हा फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. राष्ट्रीय टीममधील खेळाडूला त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा अवॉर्ड दरवर्षी देण्यात येतो.

| Oct 31, 2023, 07:37 AM IST
1/7

फुटबॉल दिग्गज डेव्हिड बेकहॅम यांनी मेस्सीला या हा अवॉर्ड देऊन सन्मानित केलं. 

2/7

अर्जेंटिनासाठी फिफा वर्ल्डकप जिंकणाऱ्या मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2021 मध्ये बोलन डी'ओर पुरस्कार जिंकलाय.

3/7

लिओनेल मेस्सी हा सर्वाधिक वेळा बोलन डी'ओर अवॉर्ड जिंकणारा खेळाडू आहे. 

4/7

मेस्सीनंतर क्रिस्टियानो रोनाल्डो असून त्याचे नावे पाच वेळा हा अवॉर्ड जिंकण्याचा विक्रम आहे. 

5/7

मेस्सी हा बोलन डी'ओर पुरस्कार जिंकणारा पहिला मेजर लीग सॉकर खेळाडू ठरला आहे.

6/7

अवॉर्ड स्विकारल्यानंतर मेस्सी म्हणाला, “आम्ही अर्जेंटिनाच्या टीमसोबत मिळून जे काही साध्य केलंय त्याबद्दल हा पुरस्कार आहे. हा अवॉर्ड मी खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि अर्जेंटिनातील सर्व लोकांना समर्पित करतो.

7/7

मेस्सीने गेल्या वर्षी कतारमध्ये खेळलेल्या 2022 फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनासाठी चमकदार कामगिरी केली होती. यामध्ये मेस्सीचे सात गोल आणि तीन असिस्ट होते.