मंगळ ग्रहावर घिरट्या घालणारे नासाचे हेलिकॉप्टर बनवलेय 'या' व्यक्तीने; भारतीयांना वाटेल अभिमान

भविष्यात परग्रहावर वसती करण्याची वेळ मानवावर आलीच तर मंगळ हा पहिला पर्याय असणार आहे.

Oct 30, 2023, 23:41 PM IST

NASA's Ingenuity helicopter : मंगळ ग्रहावर एक हेलिकॉप्टर घिरट्या घालत आहे. नासाचे हे  हेलिकॉप्टर एका भारतीय व्यक्तीने तयार केले आहे. डॉ जे बॉब बलराम (Dr J Bob Balaram)  असे या हेलिकॉप्टरची निर्मीती करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

1/7

 सन 2020 मध्ये एक उपग्रह आणि रोव्हर मंगळ ग्रहावर पाठवला. यासबोतच हे छोटेसे हेलिकॉप्टर देखील मंगळग्रहावर लँड झाले. 

2/7

या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं मंगळाच्या वातावरणातल्या विविध थरांचा अभ्यास केला जात आहे. यातून मिळणा-या माहितीचा फायदा प्रत्यक्ष मानवी मोहिमांमध्ये होणार आहे. 

3/7

हा वेग पृथ्वीवरील हेलिकॉप्टरपेक्षा 10 पट जास्त आहे.   मंगळावर असलेल्या शीत आणि उष्ण वातावरणाचा यावर कोणताही परिणाम झालेला नाही.  

4/7

एका टेनिस चेंडूपेक्षा थोडंसंच मोठं असलेल्या या हेलिकॉप्टरचे पंखे मिनीटाला 3000 फे-या एवढ्या गतीनं फिरत आहेत. 

5/7

या हेलिकॉप्टरचं वस्तुमान केवळ 1.8 किलोग्रॅम आहे. 

6/7

डॉ जे बॉब बलराम (Dr J Bob Balaram)  यांनी या हेलिकॉप्टरची निर्मीती केली आहे. बलराम हे भारतीय असून ते नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमध्ये (जेपीएल) कार्यरत आहेत.   

7/7

2020 पासून हे  हेलिकॉप्टर अद्याप पर्यंत कार्यरत आहे. या इनजेनिटी (Ingenuity) असे नाव देण्यात आले आहे.