मधुमेहाच्या रुग्णांनी ही फळे खाणे टाळावे, आरोग्याचे होईल नुकसान

तसं पाहायला गेलं तर फळ खाणं आरोग्यासाठी चांगलं असते. मात्र, काही आजार असल्यास तज्ज्ञांच्या मते ही फळे खाणं आरोग्यासाठी नुकसानदायर ठरु शकते. तुम्हाला मधुमेहाचा आजार असताना काही फळ खाणे टाळलेलेच बरे, कोणती आहेत ही फळे जाणून घ्या. 

| Nov 26, 2023, 14:16 PM IST

Diabetes Patient Should Avoid These Fruits: तसं पाहायला गेलं तर फळ खाणं आरोग्यासाठी चांगलं असते. मात्र, काही आजार असल्यास तज्ज्ञांच्या मते ही फळे खाणं आरोग्यासाठी नुकसानदायर ठरु शकते. तुम्हाला मधुमेहाचा आजार असताना काही फळ खाणे टाळलेलेच बरे, कोणती आहेत ही फळे जाणून घ्या. 

1/7

मधुमेहाच्या रुग्णांनी ही फळे खाणे टाळावे, आरोग्याचे होईल नुकसान

health tips in marathi Diabetes Patient Should Avoid These Fruits

मधुमेहाच्या रुग्णांनी अगदी लहान सहान गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यातीतच एकच म्हणते फळे. काही फळे ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक ठरु शकतात. कारण काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते तसंच त्याची ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) जास्त असते. त्यामुळं ही फळे मधुमेहाच्या रुग्णांनी खाणे टाळावे. 

2/7

आंबा

health tips in marathi Diabetes Patient Should Avoid These Fruits

आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. आंब्याची चव प्रत्येकालाच आकर्षिक करुन घेते.मात्र ज्या व्यक्तींची ब्लड शुगर लेव्हल जास्त आहे. त्यांनी आत्ताच या फळाला त्याच्या आहारातून बाद करावे. कारण या फळात शुगर आणि कार्ब्स जास्त असतात.

3/7

केळं

health tips in marathi Diabetes Patient Should Avoid These Fruits

केळं हे तर अनेकांचे आवडते फळ असून सहज बाजारात उपलब्ध अशते. केळं ताकद मिळवण्यासाठी खाणे ही फायद्याचे आहे. मात्र मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही केळ खावू नये. कारण यात कार्बोहायड्रेटची मात्रा जास्त असते. जी मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी वाईट असते. 

4/7

द्राक्षे

health tips in marathi Diabetes Patient Should Avoid These Fruits

मधुमेहाच्या रुग्णांनी द्राक्षे खाणे टाळले पाहिजे. या फळाच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. यामुळं तब्येत बिघडण्याची शक्यता असते. तुम्ही कमीत कमी एक ते दोन द्राक्षे खाऊ शकतात.   

5/7

लिची

health tips in marathi Diabetes Patient Should Avoid These Fruits

हे खूपच स्वादिष्ट्य फळ आहे. बिहारमधील मुजफ्फपुर जिल्हात केली जाते. मधुमेहाच्या रुग्णांनी हे फळ खावू नये यात नैसर्गिकरित्या साखर आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते. 

6/7

अननस

health tips in marathi Diabetes Patient Should Avoid These Fruits

अननसामध्ये हाय शुगर सोबतच कार्बोहायड्रेट असतात त्यामुळं मधुमेहाच्या रुग्णांना हे फळ न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळं ब्लड शुगर अचानक वाढू शकते.   

7/7

Disclaimer

health tips in marathi Diabetes Patient Should Avoid These Fruits

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)