₹120000000000 संपत्ती असूनही लोकल ट्रेनमधून प्रवास; श्रीमंतांना दाखवतोय आरसा!

त्यांची एकूण संपत्ती 121207100000 रुपये आहे. पण तरीही ते मुंबईच्या लोकल ट्रेनमधून ऑफिसला जाताना दिसतात. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Jan 19, 2025, 19:29 PM IST

Niranjan Hiranandani inspirational story: त्यांची एकूण संपत्ती 121207100000 रुपये आहे. पण तरीही ते मुंबईच्या लोकल ट्रेनमधून ऑफिसला जाताना दिसतात. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

1/10

₹120000000000 संपत्ती असूनही लोकल ट्रेनमधून प्रवास; श्रीमंतांना दाखवतोय आरसा!

Niranjhan Hiranandani networth local train journey Inspirational Story

Niranjan Hiranandani inspirational story: देशाहस जगभरातील करोडपती आणि अब्जाधीशांच्या आलिशान जीवनशैलीची अनेकदा चर्चा होते. करोडो रुपयांचे बंगले, लाखो रुपयांच्या गाड्या, लक्झरी लाईफ अशा यांच्या कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील.

2/10

साधेपणाने सर्वांचे मन जिंकले

Niranjhan Hiranandani networth local train journey Inspirational Story

पण आज आम्ही तुम्हाला ज्या श्रीमंत माणसाबद्दल सांगणार आहोत त्याने त्याच्या साधेपणाने सर्वांचे मन जिंकले आहे. श्रीमंत व्यक्तींना या माणसाने आरसा दाखवलाय.

3/10

लोकल ट्रेनमधून ऑफिसला

Niranjhan Hiranandani networth local train journey Inspirational Story

त्यांची एकूण संपत्ती 121207100000 रुपये आहे. पण तरीही ते मुंबईच्या लोकल ट्रेनमधून ऑफिसला जाताना दिसतात. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

4/10

साधेपणाने लोकांची मने जिंकली

Niranjhan Hiranandani networth local train journey Inspirational Story

ज्यामध्ये रिअल इस्टेट टायकून त्यांच्या लक्झरी कारऐवजी मुंबई लोकलने प्रवास करताना दिसत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांच्या साधेपणाने लोकांची मने जिंकली आहेत.

5/10

ऑफिसला जाताना कॅमेऱ्यात कैद

Niranjhan Hiranandani networth local train journey Inspirational Story

हिरानंदानी ग्रुपचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी हे मुंबई लोकलमध्ये त्यांच्या ऑफिसला जाताना कॅमेऱ्यात कैद झाले. उल्हासनगर येथील त्यांच्या कार्यालयात पोहोचण्यासाठी हिरानंदानी मुंबई लोकल ट्रेनने गेले.

6/10

दिखावा करण्याऐवजी वेळ वाचवण्यावर लक्ष

Niranjhan Hiranandani networth local train journey Inspirational Story

मुंबईतील प्रचंड वाहतुकीमुळे त्रस्त होऊन त्यांनी मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. 2023 च्या हुरुन यादीनुसार, देशातील 50 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असलेले निरंजन हिरानंदानी हे दिखावा करण्याऐवजी वेळ वाचवण्यावर लक्ष केंद्रित करतात.

7/10

भारतातील 50 सर्वात श्रीमंत व्यक्ती

Niranjhan Hiranandani networth local train journey Inspirational Story

हुरुन यादीनुसार, भारतातील 50 सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समाविष्ट असलेल्या हिरानंदानी यांची मालमत्ता 121207100000 रुपयांची आहे. त्यांच्याकडे आलिशान गाड्यांचा संग्रहही आहे पण मुंबईच्या वाहतुकीत वेळ वाया घालवण्याऐवजी त्यांनी मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

8/10

सामान्य लोकांसोबत प्रवासाचा आनंद

Niranjhan Hiranandani networth local train journey Inspirational Story

सामान्य लोकांसोबत प्रवासाचा आनंद घेत असताना काही लोक हिरानंदानी यांना ओळखतही नाहीत. जे त्यांना ओळखतात ते त्यांना भेटायला जातात. हस्तांदोलन करतात आणि सेल्फी काढतात.

9/10

चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण

Niranjhan Hiranandani networth local train journey Inspirational Story

निरंजन हिरानंदानी यांचा समावेश स्वयंनिर्मित अब्जाधीशांच्या यादीत होतो. त्यांनी शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. हिरानंदानी यांनी चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी शिक्षण घेतले. ते अकाउंटिंगचे शिक्षक होते.

10/10

रिअल इस्टेट क्षेत्राचे बादशहा

Niranjhan Hiranandani networth local train journey Inspirational Story

काही वर्षे काम केल्यानंतर त्यांच्या भावासोबत हिरानंदानी ग्रुपची स्थापना केली. त्यांनी 1981 मध्ये कापड विणण्याच्या व्यवसायाने आपला व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्यांनी रिअल इस्टेट व्यवसायात पदार्पण केले आणि यानंतर ते रिअल इस्टेट क्षेत्राचे बादशहा बनले.