शाब्बास रे पठ्ठ्या..! हरविंदर सिंगने तिरंदाजीत जिंकलं 'सुवर्ण पदक', 128 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!

Harvinder Singh won First Gold in Archery : पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला नेमबाज म्हणून हरविंदर सिंगची नोंद झाली आहे.

Saurabh Talekar | Sep 05, 2024, 00:15 AM IST
1/5

हरविंदर सिंग

भारतीय तिरंदाज हरविंदर सिंग याने भारताच्या क्रिडा इतिहासातील एक अनोखा रेकॉर्ड सुवर्णक्षरांनी लिहिला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हरविंदरने सुवर्ण लक्ष्य भेदलं आहे.

2/5

सुवर्णपदक

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये हरविंदर सिंग याने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलंय. हरविंदरने अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा 6-0 असा पराभव केला.

3/5

इतिहासात प्रथमच..!

ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकच्या इतिहासात प्रथमच भारताने तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. त्यामुळे क्रिडा इतिहासात ना भूतो अशी कामगिरी पार पडली आहे. 

4/5

कसा रंगला सामना?

हरविंदर सिंगपुढे पोलंडच्या लुकासचे आव्हान होतं. हरविंदर सिंगने पहिला सेट जिंकला अन् सुवर्ण पदकाकडे वाटचाल केली. हरविंदरने त्यानंतर इतर दोन्ही सेट जिंकले अन् गोल्ड मेडलवर नाव कोरलं.

5/5

डेंग्यूची लागण झाली अन्

दरम्यान, हरविंदर सिंग यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1991 रोजी कैथल, हरियाणात झाला होता.  दीड वर्षांचा असताना डेंग्यूची लागण झाली अन् पायातील गतिशीलता कमी झाली होती.