दीपिका-रणवीरचे बाळ जगात येताच बनणार करोडोच्या संपत्तीचा मालक, नव्या आलिशान बंगल्यात होणार स्वागत

Deepika-Ranveer Networth : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह लवकरच आई-बाबा होणार आहेत. नुकतेच  दीपिकाने बेबी बंप फोटोशूटचे काही फोटो शेअर केले होते. दीपिकाचे हे फोटो पाहून चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.   

राजीव कासले | Sep 04, 2024, 21:02 PM IST
1/11

दीपिका-रणवीरचे बाळ जगात येताच बनणार करोडोच्या संपत्तीचा मालक, नव्या आलिशान बंगल्यात होणार स्वागत

2/11

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह लवकरच आई-बाबा होणार आहेत.  नुकतेच  दीपिकाने बेबी बंप फोटोशूटचे काही फोटो शेअर केले होते.  

3/11

दीपिका आणि रणवीर याच महिन्यात आपल्या चिमुकल्याचं स्वागत करतील. तुम्हाला माहित आहे का दीपिका-रणवीरचे बाळ जगात येताच करोडोच्या संपत्तीचा मालक बनणार आहे.  

4/11

दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचं स्टार कपल आहे. दोघांचेही अनेक चित्रपट सुपरहिट झाले असून दोघांची एकुण संपत्ती करोडोच्या घरात आहे. 

5/11

दीपिका पादुकोणने 2007 मध्ये  'ओम शांति ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज दीपिकाल बॉलिवूडमध्ये 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. 

6/11

एका रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण एका चित्रपटासाठी 30 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय वेगवेगळ्या जाहीराती आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून ती दरवर्षी जवळपास 40 कोटी रुपये कमावते.

7/11

दीपिका पादुकोणचा स्वत:चा ब्यूटी ब्रँड आहे. याशिवाय काही अलिशान घरं आणि लक्झरी गाड्यांची ती मालकीन आहे. रिपोर्टनुसार दीपिकाची एकुण संपत्ती 500 कोटी रुपये इतकी आहे. 

8/11

तर बँड बाजा बारात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाय ठेवणाऱ्या रणवीर सिंहकडेही कोट्यवधींची संपत्ती आहे. एका चित्रपटासाठी रणवीर 30 ते 50 कोटी रुपये मानधन घेतो.

9/11

याशिवाय जाहीरातीच्या माध्यमातूनही तो कोट्यवधी कमावतो. रणवीरकडेही लक्झरी कारचं कलेक्शन आहे. रणवीरची एकूण संपत्ती 245 कोटी रुपये इतकी आहे.

10/11

दीपिका आणि रणवीर सिंहची संपत्ती एक केली तर जवळपास 745 कोटी रुपये इतकी होते. म्हणजे त्यांचं येणारं बाळ 745 कोटी रुपयांचा मालक असणार आहे. 

11/11

दीपिका आणि रणवीरने मुंबईतल्या बांद्रा इथे एक अलीशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. याची किंमत 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. चिमुकल्याचं स्वागत याच घरात केलं जाणार आहे.