PHOTO : पाहुण्यांना बसण्यासाठी घरात सोफा नव्हता, आलिशान मन्नतमध्ये राहणाऱ्या शाहरुख खानकडे किती संपत्ती?

Shahrukh Khan Net worth : बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरुख खानचा आज 59 वा वाढदिवस आहे. सिनेसृष्टीत 1992 मध्ये शाहरुखने पाऊल ठेवलं त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. तो आज गडगंज श्रीमंत असला तरी एक वेळ त्याला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला होता. 

| Nov 02, 2024, 12:03 PM IST
1/7

शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 मध्ये नवी दिल्लीमध्ये झाला. शाहरुख खानच्या वडिलांचं नाव ताज मोहम्मद खान होतं. ते एक व्यापारी, नेते आणि स्वातंत्र्यसैनिक होते. 

2/7

शाहरुख खानला एक बहीणदेखील आहे, तिचं नाव शहनाज लारुख आहे. ती शाहरुख खानपेक्षा मोठी आहे. तर आईचं नाव लतीफ फातिमा असं आहे. त्या न्यायदंडाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता होता. 

3/7

शाहरुख खानच्या कुटुंबाची मूळं काश्मीरपासून पेशावरपर्यंत पसरली आहेत. शाहरुख खानचे वडील मीर ताज मोहम्मद हे स्वातंत्र्य सैनिक होते पेशावर सोडून ते 1948 मध्ये दिल्लीत आले. शाहरुख खानचे आजोबा इफ्तिखार अहमद होते. ते कर्नाटक राज्याचे मुख्य अभियंता होते. त्यांनी मंगलोर बंदर बांधले आहे. 

4/7

शाहरुख खान आज आलिशान अशा मन्नत बंगल्यात राहतो. पण एक वेळ अशी होती जेव्हा त्याच्याकडे राहायला चांगल घर नव्हतं. पाहुण्यांना बसायला सोफा नव्हता. एकदा त्याचा घरी जतीन ललित आले होते तेव्हा ते गाडीवर बसून एकमेकांशी बोलले होत. 

5/7

गौरीशी लग्न झालं तेव्हा शाहरुख कार्टर रोडवरील जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील घरात राहत होता. तुम्हाला जाणून आर्श्चय वाटेल, गौरीला हनिमूनला किंग खान चित्रपटाच्या लोकेशनवर घेऊन गेला होता.  राजू बन गया जेंटलमनचं शूटिंग दार्जिलिंगमध्ये सुरु होतं. तेव्हा शाहरुख गौरीला हनिमूनसाठी दार्जिलिंगला घेऊन गेला होता. 

6/7

हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, 2024 पर्यंत शाहरुख खानची एकूण संपत्ती 7,300 कोटी रुपये आहे. शाहरुख खानकडे आलिशान घर आणि अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यांचे 6 मजली घर मन्नत 27,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. 

7/7

या बंगल्यात फिरायचं असेल तर लिफ्टने जावं लागतं. या बंगल्यात मिनी थिएटर, एक मोठी लायब्ररी आणि वैयक्तिक स्विमिंग पूल आणि जिम आहे. याशिवाय शाहरुख खानचे लंडनच्या फॅन्सी पार्क लेनमध्ये घर आणि दुबईमध्ये व्हिला देखील आहे. यासोबतच त्याच्याकडे पर्सनल जेटही आहे.