Hairstyles For Women : लग्नासाठी खास हेअर स्टाईल, फॉलो करा 'या' टिप्स
Hairstyle Tips in Marathi : लग्न म्हटलं की वधु-वर यांच्यासह कुटूंबाला ही सुंदर तयारी करायची असते. लग्नामध्ये कपडे, दागिने, मेकअप यासारख्या प्रश्नांनी अनेकांची तारांबळ उडते. लग्नात सर्वात खास आणि अनोखे दिसण्यासाठी आपल्यापैकी अनेक स्त्रिया आधीच खरेदी सुरू करतात.
Hairstyle Tips in Marathi : लग्न म्हटलं की वधु-वर यांच्यासह कुटूंबाला ही सुंदर तयारी करायची असते. लग्नामध्ये कपडे, दागिने, मेकअप यासारख्या प्रश्नांनी अनेकांची तारांबळ उडते. लग्नात सर्वात खास आणि अनोखे दिसण्यासाठी आपल्यापैकी अनेक स्त्रिया आधीच खरेदी सुरू करतात. स्कार्फपासून मेकअपपर्यंत आपण लग्नात घालतो त्या पोशाखाची आपण खूप काळजी घेतो, पण कधी कधी आपण आपली हेअरस्टाइल योग्य प्रकारे निवडत नाही. त्यामुळे आपल्या लग्नातील संपूर्ण लुक खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण आज आम्ही तुम्हाला काही खास आणि ट्रेंडी हेअरस्टाइल दाखवणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या लग्नासाठी सहज बनवू शकता. ज्यामुळे तुमचा लुक आणखी खास दिसेल. चला तर मग जाणून घेऊया खास हेअर स्टाईल..
मेसी बन

फ्रेंच बन विद गजरा

गुलाबाच्या फुलांसह खजूर वेणी

नवरीचे केस लांबसडक असतील तर तुम्ही तिच्यावर ही हेअर स्टाईल नक्कीच करू शकता. खजूरवेणी घालून तिच्या ड्रेसच्या अथवा साडीच्या रंगाची गुलाबाची फुले खजूर वेणीच्या प्रत्येक भागात अडकवायची. हे दिसायला अतिशय सुंदर दिसते. एका पानासह गुलाबाचे फूल त्यात अडकवून सुंदर हेअरस्टाईल करू शकता. दिसायलाही अत्यंत आकर्षक दिसते.
फुलांनी सजवलेले ओपन कर्ल्स

तुम्ही केसांना जर सुंदर कलर केला असेल आणि रिसेप्शनसाठी लेहंगा घालणार असाल तर तुम्ही तुमच्या केसांना खालून कर्ल करा आणि त्यावर तुमच्या ड्रेसच्या रंगाप्रमाणे फुलांचा रंग निवडा आणि केसांची हेअरस्टाईल करा. दोन्ही बाजूंनी लहान वेण्या घालून एकत्र मागे घ्या आणि खाली केस कर्ल करून त्यामध्ये फुलांची आरास करा. दिसायला हे खूपच आकर्षक आणि सुंदर दिसते. नवरीचा लुक अगदी वेगळा आणि उठून दिसेल.
आर्टिफिशियल फुलांचा करा वापर

हेअर अॅक्सेसरीजसह थोडा हलकासा आंबाडा

फुलांच्या गजऱ्यासह आंबाडा
