गणपती दर्शनाला मुंबईत जाताय? तर या 10 मंडळांच्या बाप्पांना नक्की भेट द्या
प्रत्येक मंडळ दरवेळी निरनिरळ्या संकल्पना घेऊन येते. भाविकांची लाखोंच्या संख्येत उपस्थिती असते. या मंडळांमध्ये चुरस लागलेली असते. काही मंडळेतर एवढी नावाजलेली आहेत की, दर्शनासाठी भाविक दिवसभरसुद्धा रांगेत उभे राहतात.
गणपती बाप्पाच्या येण्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण होते. सर्वात जास्त जोशात गणेश मंडळे असतात. आणि ही मंडळे गणेशोत्सवात मुंबईची शान असतात. त्यांनी केलेली आरास बघायला आवर्जून जा.
1/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/09/790730-froontttrajjjaa.jpg)
दर वर्षीप्रमाणे या वर्षीही मुंबईतील गणेश मंडळांनी ,जोरदार तयारी केली आहे . प्रत्येक मंडळ आपापल्यापरीने सजावट करत असते. मुख्य म्हणजे तोचतोचपणा कोणत्याच मंडळात बघायला मिळत नाही. प्रत्येक मंडळ दरवेळी निरनिरळ्या संकल्पना घेऊन येते. भाविकांची लाखोंच्या संख्येत उपस्थिती असते. या मंडळांमध्ये चुरस लागलेली असते. काही मंडळेतर एवढी नावाजलेली आहेत की, दर्शनासाठी भाविक दिवसभरसुद्धा रांगेत उभे राहतात.
2/11
जुहू गणेश मंडळ
![जुहू गणेश मंडळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/09/790729-juuhhuuu.jpg)
3/11
गणेश चतुर्थी मंडळ वरळी
![गणेश चतुर्थी मंडळ वरळी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/09/790728-chaturthiiiii.jpg)
हे मंडळ अधुनिकतेसाठी प्रसिद्ध आहे . मंडळाची सजावट पर्यावरणस्नेही असते. मंडळ पर्यावरणासाठी अनुकूल असणाऱ्या साहित्याचा वापर करते . पारंपारिकतेला अधुनिकतेची साथ देऊन सण साजरे करता येतात ,हे या मंडळाने दरवर्षी सिद्ध केले आहे . वरळी हे दक्षिण मुंबईत आहे. पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्थानकावर उतरून , रिक्षा करून मंडळापर्यत जाता येते .
4/11
दादरचे गणेश मंडळ
![दादरचे गणेश मंडळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/09/790727-daddarrchaa.jpg)
हे मंडळ विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते. मंडळ त्याच्या सर्वसमावेशक भुमिकेसाठी चर्चेत असते . मंडाळात बसणारी मूर्ती ही पारंपारीक आणि सुंदर असते . दादरसारख्या शहरात असल्याने मंडळाचे वातावरण मुंबईच्या संस्कृतीची जाण करून देणारे असते. दादर मध्य मुंबईत स्थित आहे . दादर स्थानकावर मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गावरच्या रेल्वे थांबतात.
5/11
वांद्र्याचे श्री गणेश मंडळ
![वांद्र्याचे श्री गणेश मंडळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/09/790726-vandraaa.jpg)
हे मंडळ त्याच्या खेळीमेळीच्या वातावरणासाठी प्रसिद्ध आहे . मंडळात भाविक सहपरिवार येतात. कारण मंडळ कौटुंबिक खेळांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. मंडळात पारंपारीक छानशी मूर्ती विराजमान होते . कौटुंबिक वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी लोक या मंडळाला भेट देतात . वांद्रे शहर पश्चिम मुंबईत आहे. वांद्रे रेल्वे स्थानकावर उतरुन, मंडळापर्यत पायी जाऊ शकता.
6/11
जी.एस.बी सेवा मंडळ
![जी.एस.बी सेवा मंडळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/09/790725-ggsssbbb.jpg)
या मंडळाचा बाप्पा उत्कृष्ट देखावा आणि सुवर्ण मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. हे मंडळ सर्व प्रथा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारे आहे . या मंडळाची ख्याती ही सोन्याच्या मूर्तीमुळे जास्त आहे. डोळे दिपवणारी सजावट मंडळ करते . हे मंडळ मुंबईतल्या किंगस् सर्कलला आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकावर उतरुन मंडळाला पायी जाता येते.
7/11
खेतवाडीचा गणराज
![खेतवाडीचा गणराज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/09/790724-khetawwwddii.jpg)
8/11
श्री गणेश मंडळ ,गणेश गल्ली
![श्री गणेश मंडळ ,गणेश गल्ली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/09/790723-ganeshhgallii.jpg)
9/11
मुंबईचा राजा
![मुंबईचा राजा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/09/790721-mumbaiicchhaaraajjaa.jpg)
मुंबईचा राजा मंडळ हे समकालीन समस्यावर आधारित देखावे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मंडळ प्रत्येक गणेशोत्सवात काहीतरी हटके कल्पना आपल्या सजावटीतून भाविकांसमोर प्रस्तुत करते. विविध शहरांतून लोकं बाप्पाचं दर्शन घ्यायला येतात. हे मंडळ परळ मधील गणेश नगरमध्ये आहे. मध्य रेल्वेच्या परळ या स्थानकावर उतरून मंडळापर्यंत चालत जाता येते.
10/11
चिंचपोकळीचा चिंतामणी
![चिंचपोकळीचा चिंतामणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/09/790720-chinnnttaammaannii.jpg)
चिंचपोकळीचा चिंतामणी एक ऐतिहासिक वारसा लाभलेले मंडळ आहे . मंडळाचा मुख्य हेतु परंपरा जोपासणे आहे . मंडळातील बाप्पाची पूजा-अर्चा पूर्वापार चालत आलेल्या नियमांना , चालीरीतींना अनुसरुन होते . मंडळाचा देखावादेखील पारंपारीक असतो . मंडळ त्याच्या साधेपणासाठी ओळखले जाते. चिंचपोकळी शहर मध्य मुंबईत आहे . मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी स्थानकावर उतरुन ,चालत मंडळात जाता येते .
11/11
लालबागचा राजा
![लालबागचा राजा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/09/790719-raajjjjaaaaaa.jpg)