Gauri Pujan : गौरीच्या ओवसासाठी खास मराठमोळे उखाणे, नाव घेताच सगळे होतील खुश

Gauri Ovasa Pujan Ukhane : गौरी-गणपतीच्या सणाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांनी गौरीचे आगमन होणार आहे. यंदा ओवश्याला घ्या सुंदर मराठमोळे उखाणे 

Gauri Ukhane Marathi : दोन दिवसांत गौरीचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आईचं रुप म्हणून ओळखली जाणारी गौरी. गौरी यंदा पूर्वात आहे त्यामुळे नववधुसाठी ओवसा हा सण महत्त्वाचा ठरला जातो. अशावेळी मराठमोळे उखाणे बायका घेऊ शकता. 

1/13

बाप्पासाठी केले मोदक गौराईसाठी केली पुरणपोळी आणि सोळा भाज्यांची आरास

2/13

हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी ... रावांच नाव घेते ओवसाच्या दिवशी

3/13

स्वर्गीय नंदनवनात सोन्याच्या केळी, ... रावांचे नाव घेते, गौरी पूजनाच्या वेळी

4/13

नाकात नथ... पायात जोडवी.. पैठणी नेसले लक्ष्मीसारखी... कानात कुड्या... हातात पाटल्या बांगड्यामध्येच किणकिणती... वेणीत खोपा... नऊवारी साडी....कपाळी चंद्रकोर कोरलेली... भांगात कुंकू... हातात तोडे.. गळ्यात चंद्रहार मनी शोभतो.. सात्रात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते... आणि ... नाव घेऊन गौराई पूजन करते...

5/13

जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण ... नाव घेते ज्येष्ठा गौरी पूजनाचे कारण

6/13

मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी ... नाव घेते गौरीच्या पूजनाशी

7/13

मोत्यांची माळ, सोन्याचा साज ... रावांचे नाव घेते, गौरी पूजन आहे आज

8/13

गौरीई पुढे लावली, समईची जोडी ... मुळे आली, आयुष्याला गोडी

9/13

गौराई समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी ...रावांचे नाव घेते, ओवसाच्या दिवशी

10/13

गौराईची पूजा, मनोभावे करते .... रावांसाठी, दीर्घायष्य मागते

11/13

गौराईची आरास सर्वांना पडली पसंत ... रावांमुळे फुलला जीवनात वसंत

12/13

उगवला सूर्य, मावळला शशी ... रावांचे नाव घेते, गौरी पूजनाच्या दिवशी

13/13

भरजरी साडी, जरतारी खण ... रावांचे नाव घेते गौराईची सण